दुसऱ्यांच्या कर्तृत्वाचे धडे किती दिवस गिरवणार, राज यांना दीपाली सय्यदचा टोला

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले. एकनाथ खडसे मुख्यमंत्री तर, उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी याबाबत फडणवीस यांचे कौतुक करताना धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते, असे म्हटले आहे. तर, यावरून शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी राज यांना टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ खडसे यांचे नाव जाहीर करून सर्वांना धक्का दिला. तसेच आपण सत्तेत सहभागी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पण नंतर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्त्वाच्या सूचनेनुसार त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्याबद्दल राज ठाकरे यांनी पत्र पाठवून, पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे, हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिले, अशा शब्दांत कौतुक केले आहे. तसेच, तुम्ही तुमचे कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिद्ध केलेलेच आहे. धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

त्यावरून दीपाली सय्यद यांनी ट्विटरवरून राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. दुसऱ्यांच्या कर्तृत्वाचे धडे किती दिवस गिरवणार? राजसाहेब कधीतरी एक आमदारावरून तुमचा धनुष्यबाण दोन आमदारांवर पोहचवून जनतेला दाखवून द्या कीस कर्तृत्व नक्की काय असते, नाहीतर सारखी दोरी मागे ओढावी लागते हे बरे नव्हे, असे त्यांनी म्हटले आहे.