घरराजकारणअपक्ष आमदारांची मते गृहीत धरली जाणार नाही, विधानसभा उपाध्यक्षांचे वक्तव्य

अपक्ष आमदारांची मते गृहीत धरली जाणार नाही, विधानसभा उपाध्यक्षांचे वक्तव्य

Subscribe

झिरवाळ म्हणाले की,  माझ्याकडे आलेल्या सह्यांच्या पत्रात घोळ आहे. नितीन देशमुख यांनी सांगितले आहे की माझी सही इंग्रजीत आहे आणि पत्रावरील सही मराठीत आहे. म्हणून त्यांची सही ग्राह्य धरू नये, असे देशमुख म्हणाले.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Shiv Sena rebel leader Eknath Shinde) यांनी आता आपल्या समर्थक आमदारांना (MLA)  घेऊन नवीन गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. शिंदे यांनी यासाठी आपल्याला पाठिंबा दिलेल्या आमदारांचे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ ( Deputy Speaker of the Assembly Narhari Jirwal) यांना पाठवले आहे. या पत्रात काही अपक्ष आमदारांचीही नावे आहेत.

या पत्रावर आता विधानसभा उपाध्यक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिंदे यांनी नवीन गट स्थापन करण्यासाठी दिलेल्या यादीत अपक्ष आमदारांची नावे आहेत. मात्र, अपक्ष आमदारांना तो अधिकार आहे की नाही हे तपासले जाईल. तसेच अपक्ष आमदारांची मतं गृहीत धरली जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांची सही तपासून घेणार असल्याचं सांगितलं आहे. कायद्यामध्ये पक्षप्रमुखांनी गटनेता नेमायचा असतो. त्यानंतर गटनेत्याने प्रतोदाची नेमणूक करायची असते. परंतु एकनाथ शिंदे हे विधीमंडाळाचे गटनेता प्रमुख होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र दिल्यानंतर अजय चौधरी यांची गटनेतेपदी नेमणूक करण्यात आली होती. तर सुनील प्रभू यांनीच प्रतोद म्हणून पत्रावर सही केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अजय चौधरींची नेमणूक गटनेतेपदी केली आहे. ते पत्र मी स्वीकारलं आहे, असं नरहरी झिरवळ म्हणाले.

झिरवाळ म्हणाले की,  माझ्याकडे आलेल्या सह्यांच्या पत्रात घोळ आहे. नितीन देशमुख यांनी सांगितले आहे की माझी सही इंग्रजीत आहे आणि पत्रावरील सही मराठीत आहे. म्हणून त्यांची सही ग्राह्य धरू नये, असे देशमुख म्हणाले. त्यामुळे माझ्याकडे आलेल्या पत्राचा मी सखोल अभ्यास करून निर्णय घेणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -