शिवसेनेत फुट पडल्यानंतर सुप्रीम कोर्ट तसेच निवडणूक आयोगामध्ये प्रकरण गेल्यानंतर कोर्ट आणि निवडणूक आयोगाकडून हे प्रकरण मार्गी लावण्यात आलं. मात्र ठाकरे गटाने पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी लवकरात लवकर घ्यावी तसेच नार्वेकर निलंबनाचं प्रकरण मार्ग लावण्यास विलंब करत असल्याची याचिका ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात केली. सोमवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली यावेळी कोर्टाने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकरालं. ‘एका आठवड्यात विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी सुरु करावी आणि स्टेटस आम्हाला रिपोर्ट करावा.’ असा आदेश अध्यक्षांना देण्यात आला यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय.
गणेशोत्सवानिमित्त प्रसार माध्यमांशी संवाद साधताना फडणवीसांनी शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात भाष्य केलंय. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत आहे त्यामुळे या संदर्भात इतर कोणीही बोलणं योग्य नाही. यावर अध्यक्ष राहुल नार्वेकरच बोलू शकतात मात्र मी एवढेच सांगू इच्छितो की श्री गणेशाचा आशीर्वाद महाराष्ट्राच्या पाठीशी आहे महायुतीच्या पाठीशी आहे.’
शिवसेनेतील चाळीस आमदारांनी बंडखोरी करत वेगळा मार्ग निवडला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळून शिवसेना-भाजपाचं महायुतीचं सरकार सत्तेत आलं. त्यांच्या जोडीला राष्ट्रावादीचे अजित पावर यांची साथ मिळाली आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने 11 मे 2023 ला सत्तासंघर्षावरील सुनावणी प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यानुसार 16 आमदारांच्या निलंबणाचा मुद्दा हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. मात्र अध्यक्षांनी चार महिने उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न केल्याने विधानसभा अध्यक्षांच्या कारवाईवर कोर्टाने नाराजी व्यक्त केली.
हे हि वाचा – सगळी संकटे दूर कर…मुख्यमंत्री शिंदेंचं गणराया चरणी साकडं