घरराजकारणउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी भेटणार राज ठाकरेंना, तर्कवितर्कांना उधाण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी भेटणार राज ठाकरेंना, तर्कवितर्कांना उधाण

Subscribe

मुंबई : राज्यात सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर शिंदे सरकारने धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर राजकीय समीकरणेही बदलण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेत व राज्याचे उपमुख्यमंत्री आज सकाळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जाते.

महाविकास आघाडीला सत्तेवरून खाली खेचत शिवसेना-भाजपा युतीने सरकार स्थापन केले. आघाडीला साथ देणारे काही घटक पक्ष तसेच अपक्षांनीही या नव्या सरकारला पाठिंबा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीत आणि सरकारच्या बहुमत चाचणीवेळी मनसेने आपले एक मत शिंदे-भाजपा सरकारच्या पारड्यात टाकले होते. आता उपमुख्यमंत्री फडणवीस आज सकाळी ११ वाजता राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – पुढील चार दिवस समुद्राला उधाण; जाणून घ्या भरतीच्या तारीख व वेळा

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ३० जूनला शपथ घेतल्यानंतर नव्या मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही. त्यामुळे या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार याची चर्चा सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी होणारी ही भेट होणार असून नवे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच हे दोन नेते भेटत असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मनसे नेते अमित ठाकरे यांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरू होती. परंतु प्रत्यक्ष राज ठाकरे यांनीच त्याचा इन्कार केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर राज ठाकरे यांनी एक पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले होते. त्याचा उल्लेख फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. शिवाय, नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना आपण राज ठाकरे यांना भेटणार असल्याचे सांगितले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला सुंदर पत्र लिहिले. मी उत्तर देणार होतो. मी प्रयत्नही केला पण त्यांच्यासारखे शब्द मला सुचले नाहीत. फोन करुन त्यांचे आभार मानले आणि त्यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचे ते म्हणाले होते. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाली झाली होती. त्याबद्दलही मला त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायची आहे, असेही ते म्हणाले होते.

हेही वाचा – आजपासून देशात मोफत बुस्टर डोस देण्यास सुरुवात, सर्व प्रौढांना 75 दिवसांत मिळणार लस

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -