Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर राजकारण बाळासाहेब थोरातांशी राजीनाम्यासंदर्भात चर्चा झाली : अजित पवार

बाळासाहेब थोरातांशी राजीनाम्यासंदर्भात चर्चा झाली : अजित पवार

Subscribe

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता, त्यावेळी याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती अजित पवार यांच्याकडून देण्यात आली आहे.

चिंचवड विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाना काटे यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये फॉर्म भरण्यात आला. यानंतर अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी पोटनिवडणुकींसह बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबाबत देखील माहिती दिली आहे. अजित पवार यांनी बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा दिला असल्याचे सांगितले.

यावेळी अजित पवार म्हणाले की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी बाळासाहेब थोरातांना फोन केला होता. त्याच्या काहीवेळ आधीच मला त्यांच्या राजीनाम्याची बातमी कळली. यानंतर शुभेच्छा देताना मी त्यांना विचारले की, याक्षणी मी तुम्हाला हे विचारावे की नाही.. पण आपण राजीनामा दिला आहे का? यावेळी बाळासाहेबांनी हा पक्षांतर्गत विषय असून मी राजीनामा दिला असल्याचे सांगितले. तसेच पक्षश्रेष्ठींशी बोलून पुढील भूमिका मांडणार असल्याचेही थोरात म्हणाले.’

- Advertisement -

हेही वाचा – “माझ्या वरळी मतदारसंघात शिंदे-फडणवीसांना सभा घ्यावी लागते, हाच माझा विजय आहे” – आदित्य ठाकरे

याशिवाय अजित पवार यांनी चिंचवड पोटनिवडणुकीमधील नाराज उमेदवारांशी चर्चा करून त्यांची नाराजगी दूर करणार असल्याचे सांगितले. राहुल कलाटे हे नाराज असले तरी त्यांची राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून भेट घेण्यात येईल. अजित गव्हाणे, अण्णा बनसोडे हे राहुल कलाटे यांची भेट घेऊन त्यांची नाराजगी दूर करतील, पण त्यांना काय करायचं आहे याचे व्यक्ती स्वातंत्र्य त्यांना असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. राहुल कलाटे यांना उमेदवारी न देता नाना काटे यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पाठिंबा दिल्याचे यावेळी अजित पवारांनी सांगितले.

- Advertisement -

चर्चा करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला
चिंचवड आणि कसबा विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला. परंतु महाविकास आघाडीने चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचे अजित पवारांनी सांगितले. तसेच पंढरपूर, कोल्हापूर, देगलूर या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या होत्या. फक्त मुंबई याला अपवाद होती. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना आणि आम्ही पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली आणि निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

- Advertisment -