Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर राजकारण भाजप जिल्हा उपाध्यक्षाच्या कार्यालयावर दगडफेक; तरुणांचा तपास सुरु

भाजप जिल्हा उपाध्यक्षाच्या कार्यालयावर दगडफेक; तरुणांचा तपास सुरु

Subscribe

भाजपचे कल्याण डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष संदीप सिंह यांच्या जनसंपर्क कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर पोलीस दगडफेक करणाऱ्या तरुणांचा शोध घेत आहेत.

भाजपचे कल्याण डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष संदीप सिंह यांच्या जनसंपर्क कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर पोलीस दगडफेक करणाऱ्या तरुणांचा शोध घेत आहेत. कल्याण पश्चिम येथील वालधुनी परिसरात संदीप सिंह यांचे भाजप जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालायावर अज्ञात तरुणांनी भर दुपारी दगडफेक केली. या घटनेनंतर आता महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे पोलीस या तरुणांचा शोध घेत आहेत. ( Dombivali Stone pelting at office of BJP District Vice President The investigation of the youth begins )

गुरुवारी दुपारच्या सुमारास काही अज्ञात तरुणांकडून भाजप जनसंपर्क कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. सुदैवाने यावेळी कार्यालय बाहेर कोणी कार्यकर्ता नव्हता. अचानक दगडफेक झाल्याने कोणालाच काही समजलं नाही. काही समजायच्या आत हल्लेखोरांनी तेथून पळ काढला होता.

- Advertisement -

समोर आलेल्या माहितीनुसार, या दगडफेकीच्या घटनेत कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या गाड्याच्या काचा फुटून नुकसान झालं आहे. दगडफेक करणारे तरुण सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेत.

संदिप सिंह काय म्हणाले?

याबाबत म्हणाले की, संदीप सिंह यांनी याआधी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या. त्याकडे मी दुर्लक्ष केलं. मात्र, काल पुन्हा दगडफेकीचा प्रकार घडला याबाबत मी महात्मा फुले पोलिसांना तक्रार देणार असल्याचं सांगितलं. तर महात्मा फुले चौक पोलिसांनीदेखील घटनेचा तपास सुरु केला आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: अजित पवार आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली; अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावरुन आरोप-प्रत्यारोप )

- Advertisment -