घरराजकारणबाळासाहेबांमुळेच राज्याराज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष निर्माण झाले, संजय राऊतांचं मोठं विधान

बाळासाहेबांमुळेच राज्याराज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष निर्माण झाले, संजय राऊतांचं मोठं विधान

Subscribe

एक असं आंदोलन उभं केलं जे भूमिपुत्रांचे प्रश्न आहेत. त्या भूमिपुत्रांच्या प्रश्नांना वाचा फोडल्यावर सरकारनं त्यात लक्ष घातलं नाही, तर हा वणवा देशात पेटू शकतो. याची सरकारला दखल घ्यावी लागेल, असंही संजय राऊतांनी सांगितलंय

मुंबईः 56 वर्षांपूर्वी शिवसेनेच्या स्थापनेवेळी बाळासाहेबांवर प्रांतीयवादी शिक्का मारण्यात आला. पण बाळासाहेबांनी प्रादेशिक पक्षांची जी मुहूर्तमेढ रोवली, त्यानंतर देशभरात प्रादेशिक पक्ष निर्माण झाले, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणालेत. संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

बाळासाहेब ठाकरेंनी कुंचला, लेखणी आणि वाणी या तीन अमोघ शस्त्रांचा वापर करून मराठा माणसावरील अन्यायाविरुद्ध वाचा फोडली. एक असं आंदोलन उभं केलं जे भूमिपुत्रांचे प्रश्न आहेत. त्या भूमिपुत्रांच्या प्रश्नांना वाचा फोडल्यावर सरकारनं त्यात लक्ष घातलं नाही, तर हा वणवा देशात पेटू शकतो. याची सरकारला दखल घ्यावी लागेल, असंही संजय राऊतांनी सांगितलंय.

- Advertisement -

56 वर्षांपूर्वी शिवसेनेच्या स्थापनेवेळी बाळासाहेबांवर प्रांतीयवादी शिक्का मारण्यात आला. पण बाळासाहेबांनी प्रादेशिक पक्षांची जी मुहूर्तमेढ रोवली, त्यानंतर देशभरात प्रादेशिक पक्ष निर्माण झाले. संपूर्ण देशातील राज्याराज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष निर्माण झाले. प्रत्येक प्रादेशिक पक्ष भूमिपुत्रांची भूमिका घेऊनच उभे राहिले. पश्चिम बंगाल, उडिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश किंवा दक्षिणेतील राज्ये असतील. कर्नाटक असेल, देशाचं राजकारण प्रादेशिक पक्षांच्या करंगळीवर उभं आहे. यांचं श्रेय 56 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या शिवसेनेला द्यावं लागेल. शिवसेना आजही महाराष्ट्र आणि देशामध्ये दिल्लीच्या तख्तापर्यंत राजकारण करत असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय.

महाविकास आघाडीसंदर्भातील विसंवादाबद्दल ते म्हणाले, अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. तिन्ही पक्षाचे नेते महाविकास आघाडीतील नेत्यांचा संवाद उत्तम आहे. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात मविआमध्ये योग्य समन्वय आहे. भाजपनं कितीही अफवा पसरवल्या तरीही त्याचं फळ त्यांना मिळणार नाही. नवाब मलिक, अनिल देशमुख यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आलेला आहे. जो त्यांचा संविधानिक आणि नैतिक अधिकारसुद्धा आहे. 302 कलमाखाली खून केलेल्या कैद्यालाही घटनेनं मतदानाचा अधिकार असतो. तुम्ही घटनेची कलमं पाहा, असंही ते म्हणाले.

- Advertisement -

ज्यांनी जादा उमेदवार उभा केलेला आहे, त्यांना 20 मतांची गरज आहे. ती 20 मतं चोऱ्या-माऱ्या करून आणणार काय? दहशत, दबाव हे सगळे प्रकार आता लोकशाहीमध्ये आता खुलेआम सुरू झालेत. पूर्वी छुपेपणाने सुरू होते. आता निर्लज्जपणाने काही लोकांनी सुरू केलेय. ती लोकशाही नसून तानाशाही असेल, असंही त्यांनी सांगितले.


हेही वाचाः मुंबईकरांच्या तणावमुक्तीसाठी संडे स्ट्रीट योजना; पोलीस आयुक्तांच्या योजनेला गृहमंत्री, अक्षयकुमारची भेट

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -