घरराजकारणआत्मपरीक्षण करण्याऐवजी आम्हाला बंडखोर म्हटले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका

आत्मपरीक्षण करण्याऐवजी आम्हाला बंडखोर म्हटले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका

Subscribe

मुंबई : हिंदुत्वाचा विचार सोडल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी भाजपाच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या टीकेचा खरपूस समाचार घेतला.

रवींद्र नाट्यमंदिरात गुरुवारी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांचे समर्थक मोठ्या संख्येने आले होते. मात्र, त्यांना मुख्यमंत्र्यांसाठी तीन तास प्रतीक्षा करावी लागली. या सत्काराला उत्तर देताना चौफेर फटकेबाजी करत मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत व आदित्य ठाकरेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. आत्मपरीक्षण करायचे सोडून आम्ही कसे बंडखोर आहोत, हे सांगण्यात आले, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – हॅरिस पुलाखाली पाण्यात अडकली विंग कमांडर मराठे कुटुंबीयांची कार, सुटका करण्यात यश

राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधताना मुख्यमंत्री म्हणाले, एकीकडे आमच्या आमदारांना निधी मिळत नव्हता आणि दुसरीकडे राष्ट्रवादी सगळीकडेच आमदारकीची तयारी करत होती. आज शिवसैनिकांना काय मिळाले? कामे मिळाली नाहीत तर, गुन्हे दाखल झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, नामशेष होणारा शिवसैनिक आम्ही वाचवला आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

‘उठावा’वरही सिनेमा निघेल
माझ्यासह ४० आमदारांनी जो ‘उठाव’ केला होता, त्यावर एक सिनेमा निघू शकतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले. विधान परिषद निवडणुकीनंतरचा घटनाक्रम हा एखाद्या सिनेमाला साजेसा होता. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल…’ असे सांगणाऱ्या शहाजी बापू पाटील यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम आम्ही केल्याचे शिंदे म्हणाले.

हेही वाचा – पुढील चार दिवस समुद्राला उधाण; जाणून घ्या भरतीच्या तारीख व वेळा

संजय शिरसाटांच्या निशाण्यावर संजय राऊत
एकनाथ शिंदे यांच्या उठावामध्ये आघाडीवर असलेल्या संजय शिरसाट यांनी देखील संजय राऊतांवर कडाडून टीका केली. एखाद्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार हरला तर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांन दु:ख व्हायचे. ते मीनाताई त्यांना ग्लासभर दूध देत असत. पण पण आज काही लोक रोज सकाळी उठून थेट शरद पवारांकडे जातात, अशी टीका संजय शिरसाठ यांनी राऊतांवर केली. निधी मागितल्यावर त्यासाठी १० टक्क्यांची मागणी व्हायची, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

काही लोक रोज टिव्हीवर बोलतात त्यांना काय बोलाव हेच कळत नाही अशी टीका शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर केली. ज्यांची बायको ऐकत नाही, ते म्हणतात निवडून येणार नाही, असे सांगून ते म्हणाले, आपल्याला बदला घ्यायचा आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -