घरराजकारणफोटोसाठी लोकांच्या जवळ जावं लगतं, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना चिमटा

फोटोसाठी लोकांच्या जवळ जावं लगतं, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना चिमटा

Subscribe

पुण्यामध्ये लोकांचा स्वागत स्वीकारण्यासाठी गेलो होतो, तर फोटो काढण्यासाठी गेले अशी माझ्यावर टीका करण्यता आली. पण फोटो काढण्यासाठी देखील लोकं जवळ यायला लागतात, असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला.

एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी उभी लढत संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप, उत्तर – प्रत्युत्तराच्या फैऱ्या झडत असून टोले लगावण्याची एकही संधी दोन्ही गटाकडून सोडली जातन नाहीये. नुकतच गणेशोत्सवा निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक मंडळांना भेट देत आहेत. याचदरम्यान दहिसर येथील गणेश मंडळाला भेट देतांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार शिंदेंनी घेतला आहे. आपले हात आकाशाला कधीच टेकणार नाहीत, आपण जमिनीवरचआहोत असं वक्तव्य करत ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.

मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

- Advertisement -

शिंदे सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद आहेत. तसचे शिंदे-फडणवीस सरकारने प्रत्येक सणांवरील निर्बंध काढले आहेत यामुळे पावसातही लोकांचा उत्साह दुप्पट झाला आहे. पुण्यामध्ये लोकांचा स्वागत स्वीकारण्यासाठी गेलो होतो, तर फोटो काढण्यासाठी गेले अशी माझ्यावर टीका करण्यता आली. पण फोटो काढण्यासाठी देखील लोकं जवळ यायला लागतात, असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला. तसेच प्रेमाने लोकांना जवळ घ्यावे लागते, कुणीही कुणाच्या बाजूला फोटो काढण्यासाठी जात नाही, गणराय या सगळ्यांना सुबुद्धी येवो अशी प्रार्थना असा खरपूस समाचार शिंदेंनी ठाकरेंचा घेतला.

यासोबतच टीका करायची नाही आम्ही कामातून उत्तर देऊ असंही शिंदे यावेळी म्हणालेत. दहीहंडी उत्सव यासह गणेशोत्सवानंतर आता नवरात्रही जोरदार साजरी करता येणार असल्याचे संकेत शिंदेंनी दिले आहेत

- Advertisement -

हे ही वाचा – शिक्षा होणारच; याकूब मेमन प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

 

 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -