देवेंद्र आभाळा एवढा…, अतुल भातखळकर यांच्याकडून कौतुक

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपाप्रणित सरकार स्थापन होईल, अशी अटकळ बांधली जात होती. तसेच, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असा अंदाज बांधला होता. पण मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना नेते एकनाथ खडसे यांचे नाव जाहीर करून फडणवीस यांनी सर्वांनाच धक्का दिला.

शिवसेनेतील जवळपास 39 आमदारांसह अन्य 11 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने सरकार अल्पमतात आले. अशा वेळी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा सरकार स्थापनेचा दावा करेल, हे निश्चित होते. त्यांना या 50 आमदारांचा पाठिंबा होता.

मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवला, तुम्ही तो करून दाखवणार का? असे आव्हान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले होते. नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ खडसे यांच्या नावाची घोषणा करून देवेंद्र फडणवीस यांनी त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांच्या या निर्णयाचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी स्वागत करताना ‘देवेंद्र आभाळा एवढा…’ असे ट्विट केले आहे. सत्ता समोर आल्यानंतर मोह सोडायला संघाचे संस्कार आणि देवेंद्र फडणविस यांचे काळीज लागते…, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.