घरराजकारणकोणताही वाद नाही, खात्यांमध्ये बदल करायचा असेल तर करू शकतो; उपमुख्यमंत्र्यांनी केले...

कोणताही वाद नाही, खात्यांमध्ये बदल करायचा असेल तर करू शकतो; उपमुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

Subscribe

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर आज जाहीर झाले. खातेवाटपावरून भाजपा आणि शिंदे गटात धुसफूस असल्याची चर्चा होती. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही चर्चा फेटाळून लावली. खात्यांमध्ये बदल करायचा असेल तर, आम्ही करू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार 29 जूनला पायउतार झाल्यानंतर 30 जूनला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर 39 दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आता त्याच्या चार दिवसांनंतर खातेवाटप जाहीर करण्यात आले. खातेवाटपावरून शिंदे गट आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू असल्याने हे वाटप रखडल्याचे सांगण्यात येत होते.

- Advertisement -

हेही वाचा – राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, मुख्यमंत्री शिंदेंकडे नगरविकास तर उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे गृह, अर्थ

गृह, महसूल, अर्थ, जलसंपदा, सहकार, ग्रामविकास ही महत्त्वाची खाती भाजपाला हवी होती. तर, फडणवीस सरकारच्या काळात शिवसेनेच्या वाट्याला जी खाती आली होती, तीच खाती पुन्हा देण्याची तयारी भाजपाने दर्शविली असल्याचे सांगितले जात होते. तर शिंदे गटाने आधीच्या उद्योग, परिवहन, आरोग्य, कृषी या खात्यांबरोबरच गृह. महसूल, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास खात्यांसाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तथापि, मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, सामान्य प्रशासन खाते राहणार आहे, असे समजते. आज जाहीर झालेले खातेवाटप ध्यानी घेता ही खाती भाजपाने आपल्याकडेच ठेवली असल्याचे स्पष्ट होते.

- Advertisement -

तथापि, खात्यांवरून आमच्यात कोणताही वाद नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. आमच्याकडील एखादे खाते हवे असल्यास आम्ही ते देऊ शकतो आणि आम्हाला एखादे हवे असल्यास ते देऊ शकतात. खात्यांची अदलाबदल होऊ शकते. दुसऱ्या टप्प्याच्या विस्तारानंतर आमच्याकडे आलेली खाती भाजपाच्या मंत्र्यांना तर त्यांच्याकडील खाती शिंदे गटातील मंत्र्यांना मिळतील, असं सांगून, यात खाते महत्त्वाचे नसून त्याचा कारभार बघणारी योग्य व्यक्ती आहे का, याला महत्त्व आहे, अशी पुस्ती फडणवीसांनी जोडली.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -