घरराजकारणमहाविकास आघाडी सरकारने केवळ सूड उगविण्याचे काम केले, फडणवीस यांचा घणाघात

महाविकास आघाडी सरकारने केवळ सूड उगविण्याचे काम केले, फडणवीस यांचा घणाघात

Subscribe

मुंबई : भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पनवेलमध्ये झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. या सरकारने केवळ सूड उगविण्याचे काम केले, असा घणाघात फडणवीस यांनी केला.

मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना, पहले भी कई तूफानों का रुख मोड़ चुका हूं। हा शेर सादर करून फडणवीस म्हणाले, शिवसेना – भाजपाचे सरकार यावे ही तर श्रींची इच्छा होतीच, जनतेचीही होती. जनता आता खुला श्वास घेत आहे. कारण आधीचे सरकार रामभरोसे चालले होते. ते सोयीचे सरकार होते, जनतेचे सरकार नव्हते. राज्यात अघोषित आणीबाणी होती. पण राज्य आता प्रगतीपथावर राहणार आहे. मोदी’सैनिक आणि शिवसैनिक यांचे सरकार आता महाराष्ट्राला विकासाच्या नव्या शिखरावर नेईल.

- Advertisement -

ठाकरे सरकारने सगळे प्रकल्प बंद पाडले. प्रगतीची सर्व कामे ठप्प होती. कोट्यवधी रुपयांचे केंद्र सरकारचे प्रकल्प देखील बंद केले, असे सांगून फडणवीस म्हणाले, सरकारने अडीच वर्ष फक्त सूड उगवण्याचे काम केले. आमच्या विरोधात बोललात तर घर तोडू, वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवून तिथे फिरवू, असा त्यांचा कार्यक्रम होता. अन्याय, अत्याचाराची परिसीमा त्यांनी गाठली. त्यावेळीच प्रश्न पडला की हे सरकार कशासाठी आहे? केवळ बदला घेण्यासाठी आणि भ्रष्टाचार करण्यासाठी हे सरकार असेल, तर या सरकारला एक दिवसही शांत झोपू द्यायचं नाही, असे मी पहिल्या दिवशीच ठरविले होते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या विरोधात आपण सातत्याने संघर्ष केला.

आधीच्या सरकारमध्ये लेना बँक होती, आता देना बँक आली आहे, असे ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार म्हणाले होते. काहीच कामे न झाल्याने अडीच वर्षांचा बॅकलॉग आपल्याला भरुन काढायचा आहे. माझ्या मागे भाजपाचे सर्व आमदारांचे पाठबळ होते. आधीच्या सरकारची कामे बघून त्यांच्या अस्वस्थता होती. पण त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. सेनापतीच्या मागे कार्यकर्ते भक्कम राहिले की लढाई जिंकतोच. तिकडे सेनापती झाले, मात्र मागचे सरदार पळून गेले, असा टोला त्यांनी लगावला.

- Advertisement -

मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. ते जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांना माहीत नव्हते की, आता पुढे काय होणार आहे? हे सरकार येईल, हे माहीत नव्हते. इतर आमदारांनी पाठिंबा दिला नसता आणि हे सरकार आले नसते तर, त्यांचे आतापर्यंतचे राजकीय, सामाजिक जीवन संपले असते. पण त्यांनी कसलाही विचार केला नाही, असे फडणवीस म्हणाले.

रोज तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागायचा. वीर सावरकरांचा अपमान, दाऊदशी संबंधित लोकांचा बचाव अशा वातावरणात एक मर्द मराठा तयार झाला आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी एकनाथ शिंदे यांनी हिंमत केली आणि ते बाहेर पडण्यावर ठाम राहिले. सत्ता सोडून त्यांनी दाखवलेल्या धाडसाचा मला अभिमान वाटतो, असे फडणवीस म्हणाले.

एकनाथ शिंदे हेच आपले नेते आहेत. चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असे सांगून फडणवीसांनी यावरील चर्चेला पूर्णविराम दिला.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -