घरराजकारणअमित शाह यांच्या सुरक्षाव्यवस्थेतील ढिलाई उघड, संशयित तरुणाला पोलिसांकडून अटक

अमित शाह यांच्या सुरक्षाव्यवस्थेतील ढिलाई उघड, संशयित तरुणाला पोलिसांकडून अटक

Subscribe

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सोमवारी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तसेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणनीती जाहीर करण्यासाठी मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत ढिलाई झाल्याचे उघड झाले आहे. आंध्र प्रदेशातील एका खासदाराचा पीए असल्याची बतावणी करत अमित शाह यांच्या आसापस एक तरुण फिरत होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व होते. अपेक्षेप्रमाणे त्यांनी स्थानिक भाजपा नेत्यांसमोर मिशन 150चे लक्ष्य ठेवले. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केली. मात्र या दौऱ्यात एक तरुण अमित शाह यांच्या आसपास फिरत असल्याचे पाहून मंत्रालयातील एका अधिकाऱ्याला संशय आला. त्याने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हैदराबादच्या एका खासदाराचा पीए असल्याची बतावणी केली. त्यामुळे या अधिकाऱ्याचा संशय अधिकच बळावला आणि त्याने ही माहिती पोलिसांना दिली.

- Advertisement -

पोलिसांनी शोध घेत त्या तरुणाला ताब्यात घेतले. त्याचे नाव हेमंत पवार असून तो धुळे जिल्ह्याचा आहे. 32 वर्षीय हेमंत पवारकडे गृह मंत्रालयाचे ओळखपत्र होते, असे सांगितले जाते. पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाचा ब्लेझर घातलेल्या हेमंत पवारकडे खासदारांच्या पीएकडे असणारा पासही होता. तसेच केंद्रीय गृह मंत्रालय असे लिहिलेल्या रिबिनला त्याने हा पास जोडला होता. तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेरही फिरताना आढळला होता. तो अमित शाह यांचे सुरक्षा कडे भेदून त्यांच्यापर्यंत कसा पोहोचला, त्यामागे त्याचा हेतू काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

उद्धव ठाकरेंना जागा दाखवण्याची वेळ आली : अमित शाह
अमित शाह यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात भाजपा नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रातले हिंदूविरोधी राजकारण आपल्याला संपवायचं असल्याचे सांगत शाह यांनी भाजपच्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली. तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावावर, देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मते मागितली आणि जिंकून आले. तुम्ही जनतेचा विश्वासघात केला असल्याचे शाह यांनी सांगितले. मुंबईतील राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपाचे असावे. आता उद्धव ठाकरेंना जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असेही अमित शाह यांनी त्या बैठकीत सांगितले.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -