भोपाळ : गुना जिल्ह्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या झालेल्या जाहीरसभेत राम मंदिराचा मुद्दा केंद्रस्थानी होता. काँग्रेसवर हल्लाबोल करताना उत्तर प्रदेशातील राम मंदिराच्या बांधकामात अडथळा आणल्याचा आरोप अमित शहा यांनी केला. तसेच, मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार आल्यास अयोध्येतील प्रभू रामलल्लाच्या दर्शनाचा खर्च उचलेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
हेही वाचा – राज्यातील सरकार ‘XX बगिचा’; राऊतांचा घणाघात, म्हणाले, तुम्ही डुकरासारखं…
मध्य प्रदेशमध्ये येत्या 17 नोव्हेंबर 2023 रोजी निवडणूक होत असून 3 डिसेंबर 2023 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत मुख्य लढत भाजपा आणि काँग्रेस यांच्यात होत आहे. गुनाच्या राघोगडमध्ये सोमवारी एका प्रचारसभेला संबोधित करताना अमित शाह यांनी मध्य प्रदेशमधील जनतेला हे आश्वासन दिले. तुम्ही 3 डिसेंबरला मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार स्थापन करा, हे सरकार तुम्हाला प्रभू रामलल्लाचे मोफत दर्शन घेण्यासाठी मदत करेल, असे ते म्हणाले. काँग्रेसवर टीका करताना त्यांनी मंदिराचे बांधकाम रोखण्याचा प्रयत्न करणे आणि भारतीय संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप केला.
राघोगढ़ की जनता ने भी इस बार मध्य प्रदेश में सुशासन का कमल खिलाने का संकल्प लिया।
https://t.co/f9MlBoMu3t— Amit Shah (@AmitShah) November 13, 2023
ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने सातत्याने आपल्या तीर्थक्षेत्रांचा आणि भारतीय संस्कृतीचा अपमान केला आहे. रामलल्ला 550 वर्षांपासून ‘अपमानित’ अवस्थेत होते. राम मंदिराचा मुद्दा काँग्रेसने 70 वर्षे प्रलंबित ठेवला, त्यावर दिशाभूल केली आणि पुढे ढकलत ठेवला. तुम्ही नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान केले, त्यानंतर त्यांनी राम मंदिराचे भूमिपूजन केले आणि आज अयोध्येत राम मंदिर बांधले जात आहे.
हेही वाचा – भाजपला मत देईल, तोच रामलल्लाचं दर्शन घेईल, असा कायदा केलाय का? शहांच्या वक्तव्यावरून राऊतांचं टीकास्त्र
पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येत राम मंदिर बांधले, काशी विश्वनाथ कॉरिडॉर तयार केला, बाबा महाकाल का लोक कॉरिडॉर बनवला आणि सोमनाथ मंदिर सोन्याचे बनविण्यात येत आहे. पंतप्रधानांनी बद्रीनाथ धाम आणि केदार धाम यांचे देखील पुनर्निमाण केले, असे ते म्हणाले.