घरराजकारणगुजरात निवडणूकGujarat Election 2022: माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा निवडणूक लढवण्यास नकार

Gujarat Election 2022: माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा निवडणूक लढवण्यास नकार

Subscribe

एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठक दिल्लीत होत आहे. तर, दुसरीकडेया नेत्यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. सध्या सुरू असलेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि ओपी माथूर यांच्याशिवाय गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गुजरात भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांचा समावेश आहे.

अहमदाबाद – गुजरातमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. एकीकडे निवडणुकांचा माहोल सुरू झालेला असताना दुसरीकडे भाजपामध्ये धुमश्चक्री पाहायला मिळत आहे. कारण, भाजपामध्य अनेक वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला असून त्यांनी तरुणांना संधी देण्याचं आवाहन केलं आहे.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले, मी पाच वर्षे सर्वांच्या सहकार्याने मुख्यमंत्री म्हणून काम केले. मात्र, आता नवीन कार्यकर्त्यांना जबाबदारी दिली पाहिजे. मी निवडणूक लढवणार नाही, असे मी दिल्लीला वरिष्ठांना पत्र पाठवून कळवले आहे. निवडलेल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनीही आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – By Election Results : सातपैकी चार ठिकाणी भाजपा विजयी, काँग्रेसची स्थिती काय?

याशिवाय भाजपचे ज्येष्ठ आमदार भूपेंद्र सिंह चुडासामा यांनीही निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. मी विधानसभा निवडणूक लढवणार नसून यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कळवले आहे, असे चुडासामा म्हणाले. इतर कार्यकर्त्यांना संधी मिळावी, असे मी ठरवले आहे. मी आत्तापर्यंत 9 वेळा निवडणूक लढवली आहे. मी पक्षाचे आभार मानतो. याशिवाय आमदार प्रदीप सिंह जडेजाही निवडणूक लढवणार नाहीत. जडेजा म्हणाले, मी वाटवा विधानसभा मतदारसंघाचा आमदार आहे. मला पक्षाने चार वेळा आमदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करण्याची मोठी संधी दिली आहे. 2022 मध्ये होणारी पुढील विधानसभा निवडणूक मला स्वेच्छेने लढवायची नाही.

- Advertisement -

एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठक दिल्लीत होत आहे. तर, दुसरीकडेया नेत्यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. सध्या सुरू असलेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि ओपी माथूर यांच्याशिवाय गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गुजरात भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांचा समावेश आहे.

हेही वाचा गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोडला प्रचाराचा नारळ, रोड शोमध्ये केलं जनतेला संबोधित

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा आणि केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या (CEC) बैठकीला हजेरी लावली. यामध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. याशिवाय हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या रणनीतीवरही चर्चा होऊ शकते.

भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेला गुजरात राखण्यासाठी आता अमित शाह मैदानात उतरले आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि शाह यांनी मंगळवारी राजधानी दिल्लीत गुजरात भाजप कोअर कमिटीच्या सदस्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. मंगळवारी सायंकाळी झालेली ही बैठक सुमारे सात तास चालली. तत्पूर्वी सोमवारीही शाह यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्याशी त्यांच्या घरी सुमारे आठ तास बैठक घेतली.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -