‘गुजरात निवडणुकी’साठी नितीन गडकरींवर मोठी जबाबदारी

गुजरातमध्ये सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजपा सर्व ताकद पणाला लावत आहे.

Nitin Gadkari

गुजरात राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक (gujarat assembly elections 2022) होणार आहे. गुजरातमध्ये मागील 27 वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. भाजपाची प्रयोगशाळा म्हणून गुजरात राज्याला ओळखले जाते. गुजरातमध्ये सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजपा (bjp) सर्व ताकद पणाला लावत आहे. मागील निवडणुकीत भाजपाला गुजरातमध्ये 100 चा आकडा गाठता आला नव्हता. काँग्रेसने (congress) बाजी मारल्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या होत्या. अशातच या निवडणुकांसाठी भाजपने गुजरात मध्ये चांगलाच जोर लावला आहे. गुजरात निवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

गुजरात निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi), केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्या नावांचा समावेश आहे. ऑगस्टमध्ये भाजपाने संसदीय बोर्डात बदल केले. नितीन गडकरी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची नावं बोर्डातून वगळण्यात आली. यानंतर नितीन गडकरींनी केलेली काही विधानं चर्चेत आली होती. दरम्यान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातून नितीन गडकरींना वगळण्यात आले अश्या चर्चा होत होत्या असे असतानाच नितीन गडकरींवर (nitin gadkari) गुजरात निवडणुकीसाठी स्टार प्रचारकाची भूमिका सोपविण्यात आली आहे.

आता भाजपाने जाहीर केलेल्या गुजरात निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत. नितीन गडकरी यांच्यासह केंद्रातील निवडक मंत्र्यांचा समावेश आहे. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचंही नाव यादीत आहे. स्टार प्रचारकांची एकूण संख्या 40 एवढी आहे. गुजरात भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आणि स्मृती इराणी यांच्या नावाचादेखील समावेश या यादीत आहे.

काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेशसुद्धा स्टार प्रचारकांच्या यादीत करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath), मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुजरात निवडणुकीत पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या भूमिकेत असतील. याच यादीत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल या दोघांच्या नावांचा समावेश आहे. या दोघांनी निवडणूक लढविण्यासाठी नकार दिला आहे. गुजरात राज्यात विधानसभेचे एकूण 182 मतदारसंघ आहेत. गुजरातमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. भाजपाने आतापर्यंत 160 जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे.


हे ही वाचा – पंजाबच्या विजयानंतर आपचे लक्ष्य कर्नाटककडे! आप नेत्यांनी मांडले विजयाचे गणित