घरराजकारणगुजरात निवडणूकGujarat Election 2022 : मोदींवरील टिप्पणीवरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये रंगले शाब्दिक युद्ध

Gujarat Election 2022 : मोदींवरील टिप्पणीवरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये रंगले शाब्दिक युद्ध

Subscribe

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आज संध्याकाळी पाच वाजता संपणार आहे. सर्वच पक्षांनी विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या चेहराचासंदर्भ देत मते मागितल्याबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुजरातमधील एका सभेत त्यांची खिल्ली उडवली. त्यांनी पंतप्रधान मोदींची तुलना रावणाशी केली. मोदी प्रत्येक निवडणुकीत दिसतात, त्यांना रावणसारखी 100 डोकी आहेत का? अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली. यावर भाजपा आक्रमक झाली असून आता त्यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे.

- Advertisement -

भाजपा म्हणते, महापालिका निवडणुकीतही मोदींना मत द्या. मोदी इथे काम करायला येणार आहेत का? पंतप्रधान सतत स्वतःबद्दल बोलत असतात. अन्य कोणाकडे बघू नका आणि मोदींना पाहून तुम्ही मतदान करू नका, असे आवाहन मतदारांना करतात. किती वेळा बघू तुमचा चेहरा? पालिका निवडणुकीतही तुमचा चेहरा पाहायचा, विधानसभा निवडणुकीतही तुमचा चेहरा पाहायचा, लोकसभेच्या निवडणुकीतही तुमचा चेहरा पाहायचा.. सगळीकडे तुम्ही… तुम्हाला रावणसारखे 100 मुखे आहेत का? अशी टीका खर्गे यांनी केली.

भाजपाकडून पलटवार
या मुद्द्यावरून आता भाजपने काँग्रेसवर पलटवार केला आहे. एखाद्या व्यक्तीला विरोध करता करता थेट संवैधानिक पदाला विरोध करण्यापर्यंत काँग्रेसची मजल गेली आहे. खर्गे यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेले वक्तव्य हा योगायोग नसून व्होट बँक सांभाळण्याचा हा प्रयत्न आणि उद्योग आहे, असे भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

तर, भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, हे विधान खर्गे यांनी दिलेले नसून ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून आले आहे. पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेसने अपमान केला आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी तर, संपूर्ण गुजरातचा अपमान केला आहे. त्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागायला हवी. सोनिया गांधी यांनी मोदी यांना ‘मौत का सौदागर’ असे म्हटले होते. तर, काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांनी मोदी यांना औकात दाखवण्याचे म्हटले होते. पंतप्रधांनांनी तर दहशतवादाला औकात दाखवली आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -