Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर राजकारण गुजरात निवडणूक मोरबी पूल दुर्घटनेत नागरिकांचे जीव वाचविणारा भाजपचा उमेदवार विजयी

मोरबी पूल दुर्घटनेत नागरिकांचे जीव वाचविणारा भाजपचा उमेदवार विजयी

Subscribe

ऑक्टोबरमध्ये मोरबी पूल दुर्घटना घडली. दुरुस्ती केलेला पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला व अचानक कोसळला. ही दुर्घटना घडली तेव्हा अमृतिया यांनी जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेतली. नागरिकांचे प्राण वाचविले. त्यांच्या कार्याचे कौतुकही झाले. त्यामुळेच भाजपने ब्रजेश शर्मा यांना बाजुला ठेवत अमृतिया यांना उमेदवारी दिली. भाजप पक्ष श्रेष्ठींचा विश्वास खरा ठरवत अमृतिया यांनी विजयाची पताका फडकवली.

अहमदाबाद : गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेत जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेऊन नागरिकांचे प्राण वाचविणारे भाजपचे उमेदवार कांतिलाल अमृतिया हे भरघोस मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. अमृतिया हे सहाव्यांदा निवडून आले आहेत.

अमृतिया यांचा राजकीय प्रवास हा भाजपच्याच तत्त्वांचा आहे. ते पाच वेळा भाजपचे आमदार राहिले आहेत. मात्र २०१७ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यावेळी काँंग्रेसचे उमेदवार ब्रजेश शर्मा हे विजयी झाले होते. २०२० मध्ये ब्रजेश शर्मा यांनी काँग्रेसला सोडचिठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा झालेल्या पोटनिवडणुकीत ब्रजेश शर्मा हे विजयी झाले.

- Advertisement -

ऑक्टोबरमध्ये मोरबी पूल दुर्घटना घडली. दुरुस्ती केलेला पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला व अचानक कोसळला. ही दुर्घटना घडली तेव्हा अमृतिया यांनी जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेतली. नागरिकांचे प्राण वाचविले. त्यांच्या कार्याचे कौतुकही झाले. त्यामुळेच भाजपने ब्रजेश शर्मा यांना बाजुला ठेवत अमृतिया यांना उमेदवारी दिली. भाजप पक्ष श्रेष्ठींचा विश्वास खरा ठरवत अमृतिया यांनी विजयाची पताका फडकवली.

अमृतिया हे ११३७०१ मतांनी विजयी झाले. मोरबी दुर्घटनेमुळे भाजपवर टीका करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराला ६१५८० मतांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसने जयंतीलाल पटेल यांना येथून उमेदवारी दिली होती तर आम आदमी पार्टीकडून पंकज रणसारिया हे उमेदवार होते.

- Advertisement -

मोरबी पुल दुर्घटनेप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. न्यायालयाने याची दखल घेत स्थानिक प्रशासनाल फटकारले होते. न्यायालय म्हणाले, गंभीर स्थितीबाबत खासगी ठेकेदराने (मेसर्स अजिंठा) दिलेल्या इशाऱ्यांकडे मोरबी नगरपालिकेने दुर्लक्ष केले. अजंठा कंपनी आणि मोरबी नगरपालिका यांच्यात जो पत्रव्यवहार झाला त्यात नाजूक बनलेल्या पुलाच्या दुरुस्तीपेक्षा तिकीट दर आणि करार कायम ठेवण्यावर अधिक भर दिला गेला, अशा शब्दांत न्यायालयाने खडेबोल सुनावले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले. त्यामुळे या मतदार संघातील निर्णयाकडे सर्वांचचे लक्ष लागले होते.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -