घरराजकारण"होय, मी गद्दारी केली, पण..." विरोधकांच्या आरोपावर गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर

“होय, मी गद्दारी केली, पण…” विरोधकांच्या आरोपावर गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर

Subscribe

महाविकास आघाडी सरकारचे कामकाज व्यवस्थित सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत सरकार पाडले. ज्यानंतर बंडखोरांना "गद्दार" म्हणण्यात येऊ लागले. याबाबत आता शिवसेनेतील मंत्री गुलाबराव पाटील यांनी होय, मी गद्दारी केली.. असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.

महाविकास आघाडी सरकारचे कामकाज व्यवस्थित सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत सरकार पाडले. ज्यानंतर बंडखोरांना “गद्दार” म्हणण्यात येऊ लागले. याबाबत आता शिवसेनेतील मंत्री गुलाबराव पाटील यांनी होय, मी गद्दारी केली.. असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आणि शिवसेनेच्या समर्थनात असणाऱ्या १० आमदारांना घेऊन बंडखोरी केली. त्यानंतर शिंदेंनी भाजपशी हातमिळवणी करत राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन केले. यामुळे महाविकास आघाडीला सगळ्यात मोठा धक्का बसला. ज्यानंतर शिंदे गटातील सर्व आमदारांना गद्दार म्हणण्यात येऊ लागले. तर विरोधकांनी “५० खोके एकदम ओके” म्हणत सत्तेत असलेल्या शिंदे गटाच्या आमदारांना डिवचयाला सुरुवात केली. आता अखेरीस शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी गद्दार या शब्दाला प्रत्युत्तर दिले आहे. होय, मी गद्दारी केली आहे असे सांगत त्यांनी त्यांच्यावरील आरोपांना होकार भरत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisement -

गुलाबराव पाटील यांनी जळगावातील बिलखेडा गावामध्ये विविध विकासकामे आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमांना हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांशी देखील संवाद साधला. गुलाबराव पाटील यांनी गद्दारी का केली? याबाबत खुलासा देखील त्यांनी यावेळी केला आहे. तर विरोधकांवर सुद्धा निशाणा त्यांनी निशाणा साधला आहे.

“तुम्ही काय आमच्यावर टीका करता. शरद पवार म्हणतात एकनाथ शिंदे कोण आहेत? असे म्हणत जर कोणत्याही गोष्टीत तुम्ही जातीवाद करत असाल, तर होय मी एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्याग केला. एक मराठा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी गद्दारी केली.” असे गुलाबराव पाटील यांच्याकडून यावेळी स्पष्ट सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – हसन मुश्रीफ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल, कोल्हापुरात समर्थक आक्रमक

दरम्यान, यावेळी गुलबाव पाटील उपस्थितांशी संवाद साधताना बोलले की, “विरोधाला विरोध करायचा पण मतदारसंघात काही काम करायचे नाही. बिलखेडेत साधी एक मुतारी हे लोक बांधू शकले नाहीत आणि भाषणं ठोकतात,” असा घणाघात देखील गुलाबराव पाटील यांच्याकडून विरोधकांवर करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -