Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर राजकारण हिमाचल प्रदेश निवडणूक हिमाचलच्या 68 जागांसाठी आज मतदान, सफरचंद बागायतदारांची संख्या अधिक

हिमाचलच्या 68 जागांसाठी आज मतदान, सफरचंद बागायतदारांची संख्या अधिक

Subscribe

देशात एकूण 24 लाख टन सफरचंद उत्पादन होते. त्यापैकी 60 टक्के उत्पादन हे केवळ हिमाचल प्रदेशमध्ये होते.

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज शनिवार 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून हिमाचलमध्ये निवडणुकांची तयारी करण्यात येत होती. या विधानसभा मतदानावर हिमाचल मधील सफरचंद उत्पादक प्रभाव टाकू शकतात. एकूण 68 जागांपैकी किमान 25 जागांच्या निकालावर सफरचंद शेतकऱ्यांचा निकाल प्रभावी असण्याची शक्यता आहे. (himachal pradesh assembly elections 2022)

वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांचा लाभ कमी होत आहे. कीटकनाशक आणि खतांच्या किमती मागील तीन वर्षांत दुप्पट झाल्या त्याचसोबत पॅकिंगचे साहित्य 25 टक्क्यांनी महागले. यामुळे त्यावर लावण्यात येणारा जीएसटीसुद्धा 12 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर गेला. दुसरीकडे सफरचंदाच्या किमती मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा लाभांश कमी झाला आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले. त्यामुळे हिमाचल मधील शेतकरी राजा नाराज आहे.

- Advertisement -

त्यामूळेच भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या शेतकऱ्यांना स्वतःकडे आकृष्ट करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कसर सोडली नाही. हिमाचल प्रदेशचे मूळ रहिवासी असलेले भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय माहिती प्रसारण व क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर हे दोन्ही नेते शेतकऱ्यांच्या भागांमध्ये पॅकिंग साहित्यावरील जीएसटी कमी करण्यासंदर्भात बोलत आहेत.

सफरचंद विक्रीतून 6 हजार कोटींची कमाई

- Advertisement -

हिमाचल प्रदेशच्या एकूण अर्थव्यवस्थेपैकी आठ टक्के हे सफरचंद उत्पादनातून येतात. देशात एकूण 24 लाख टन सफरचंद उत्पादन होते. त्यापैकी 60 टक्के उत्पादन हे केवळ हिमाचल प्रदेशमध्ये होते. हिमाचल प्रदेश मधील शेतकरी सफरचंद विक्रीतून 6000 कोटी रुपये कमावतात.

लहान विधान सभा; कमी मतदार
हिमाचल प्रदेश हे छोटे राज्य आहे. त्यामूळेच तेथील लोकसंख्या ही विखुरलेली आहे आणि ती पर्वत भागांमध्ये राहते. बहुतांश विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांची संख्या ही एक लाखापेक्षा कमी आहे. अशा परीस्थितीत फार कमी मतांच्या फरकाने उमेदवाराचा विजय होतो. एक किंवा दोन हजार मतदानामुळे निवडणुकीचा निकाल वेगळा लागू शकतो.

जीएसटी कमी करण्याची मागणी
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियांका गांधी आणि हिमाचल प्रदेशचे काँग्रेस प्रभारी राजीव शुक्ला यांनी जीएसटी संपविण्याची मागणी केली आहे. काँग्रेसने सफरचंद उत्पादकांच्या प्रतिनिधींबरोबर एक कृषी उत्पादन समिती गठीत करण्याचे ठरविले आहे. ही समिती किमती निश्चित करेल. पक्षाने सफरचंदाची किमान आधारभूत किंमत जाहीर करण्याची मागणी केली आहे. तर हिमाचल प्रदेशमधील शेतकरी सुद्धा कोणत्या पक्षाचे नेते काय आश्वासने देत आहेत, याकडे बारीक लक्ष ठेऊन आहेत.

मोठ्या प्रमाणात उलाढाल
हिमाचल प्रदेशात यावर्षी रोखीच्या तुलनेत मौल्यवान धातूंची उलाढाल वाढली आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये 13.99 कोटी रुपयांचे मौल्यवान धातू जप्त करण्यात आले.

18.70 रुपयांची दारू आणि ड्रग्ज जप्त केले गेले.

गुजरात 1.86 कोटी रुपयांचे मौल्यवान धातू जप्त करण्यात आले.

4.80 रुपयांची दारू आणि ड्रग्ज जप्त केले गेले.

गुजरातमध्ये निवडणूक प्रक्रियेला सुद्धा नुकतीच सुरुवात झाली आहे.


हे ही वाचा – हिमाचलमध्ये 26 नेत्यांचा भाजमध्ये प्रवेश; विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला झटका

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -