Eco friendly bappa Competition
घर राजकारण धर्मानुसार चालाल तर देशाचा पाकिस्तान होईल; संजय राऊतांचे विधान

धर्मानुसार चालाल तर देशाचा पाकिस्तान होईल; संजय राऊतांचे विधान

Subscribe

हा देश घटनेनुसारच चालला पाहिजे, जर तुम्ही धर्मानुसार चालाल तर या देश पाकिस्तान, सिरिया, इराक, इराण झाल्याशिवाय राहणार नाही.

हा देश घटनेनुसारच चालला पाहिजे, जर तुम्ही धर्मानुसार चालाल तर या देश पाकिस्तान, सिरिया, इराक, इराण झाल्याशिवाय राहणार नाही. धर्माच्या नावाने निर्माण झालेल्या देशांचा ऱ्हास होतो, असे विधान ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीशी बोलताना केले. यावेळी  संजय राऊत यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. संजय राऊत यांनी मोदी-शाहांवर देखील टीका केली. If you follow religion the country will become Pakistan Statement by Thackeray group leader Sanjay Raut

भाजपचं हिंदुत्व हे बोगस हिंदुत्व आहे. ते चोरलेल्या हिंदुत्वावर आले आहेत. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे घोषित आहे. त्यांना ती पदवी दिलेली आहे. इराणमध्ये अयोतुल्ला खोमोनी इस्लाम धर्माचं राज्य घेऊन आला आणि इथे बाळासाहेब हिंदुत्वाचा आवाज उठवत होते. पण त्यावेळी बाळासाहेबांनी सांगितले की, मी नक्कीच हिंदुत्वाचा विचार घेऊन आलो. परंतु हा देश एक राहिला पाहिजे, मला हिंदुंचा खोमेनी व्हायचं नाही. आता तुम्ही धर्मावर आधारिक राष्ट्र तयार करत आहात. परंतु धर्मावर उभी राहिलेली राष्ट्र टिकत नाहीत. पाकिस्तान, बांगलादेश, सिरिया, इराक, इराण, अफगाणिस्तान ही त्याचीच उदाहरणे आहेत. अफगाणिस्तानमध्ये तर तालिबान्यांचे राज्य आहे.

- Advertisement -

( हेही वाचा:  हिंदू संतांची सेवा मिशनऱ्यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक; मोहन भागवतांचे विधान )

तुमच्यात हिंमत असेल तर चीनशी नडा

भाजप हा फक्त पाकिस्तानशी लढतो. पाकिस्तान हे छोटं राष्ट्र आहे. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही चिनशी नडा. चीन भारतात घुसला आहे. त्याला बाहेर काढा. तुमच्यात हिंमत असेल तर अखंड हिंदुस्थान तयार करा. पाकव्याप्त काश्मिर परत आणा, असे थेट आव्हानच राऊतांनी मोदी सरकारला दिले आहे.

लोकशाही टिकवण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घ्या

- Advertisement -

देशातील सर्वच यंत्रणा भाजपने विकत घेतल्या आहेत. न्यायव्यवस्थेपासून ते निवडणूक आयोगापर्यंत सर्वच संस्था भाजपने विकत घेतल्याचा, गंभीर आरोप राऊत यांनी केला. तसेच, मतदानासाठी बॅलेट पेपर वापरा, कोणाला EVM वर विश्वास नाही. त्यामुळे जर लोकशाही टिकवायची असेल तर, बॅलेट पेपरवर मतदान घ्या. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी EVM रद्द करत पेपरवरच मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझा विश्वास हा कागदावरच आहे. त्यामुळे देशात बॅलेटपेपरवर मतदान व्हायला हवे.

ठाकरे ब्रॅंडचल सिर्फ नाम काफी है

संजय राऊत म्हणाले की, आताच्या घडीला धनुष्यबाण, शिवसेना नाव जरी उद्धव ठाकरेंसोबत नसले तरीदेखील लोक आमच्यासोबत आहेत. ठाकरे हा ब्र‌ॅंड आहे त्यांचं नावचं पुरेसं आहे. असं म्हणत राऊत यांनी निवडणुका घेण्याचे आव्हान दिले आहेत. जनता निर्णय घेईल, असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisment -