मुंबई: हरियाणातील नूह हिंसाचार प्रकरणी काँग्रेसचे मुस्लिम आमदार मम्मन खान यांच्या अटकेविरोधात काँग्रेस नेतृत्वाकडून काही निषेध किंवा वक्तव्य करण्यात आले आहे का? असा थेट सवाल विचारत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. (In Noah violence case Advocate Prakash Ambedkar severely criticized the Congress )
त्यांनी ट्वीट करत पुढे विचारले आहे की, माझ्या मुस्लीम बंधू-भगिनींसाठी हा चिंतनाचा विषय आहे की, जेव्हा काँग्रेस नेतृत्व स्वतःच्या मुस्लिम आमदारासाठी उभे राहू शकत नाही, तेव्हा तुम्ही आणि मी त्यांच्याकडून संपूर्ण मुस्लिम समाजासाठी उभे राहण्याची अपेक्षा कशी करू शकतो? काँग्रेसला प्रेमाच्या दुकानात रस नाही. तर त्यांना फक्त “स्वतःचे दुकान” उभारण्यातच रस आहे! असा घणाघाती हल्ला त्यांनी काँग्रेस पक्षावर केला.
Has there been any protest or statement from the Congress leadership against the arrest of Mamman Khan?
A food for thought for my Muslim brothers and sisters —
When the Congress leadership can not stand up for its own Muslim MLA, how can we hope that they will stand up for the… https://t.co/Dillg08eEN— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) September 17, 2023
भीमा- कोरेगाव सुनावणीवरून सरकारला सुनावले खडे बोल
कोविडी नसता तर आतापर्यंत भीमी कोरेगाव प्रकरणाची सुनावणी झाली असती. पण ही सुनावणी एका बाजूनेच सुरू आहे. माझी उलट तपासणी झाली. संभाजी महाराज यांची समाधी त्याची तपासणी झाली. पण, जशी हवी तशी तपासणी होत नाही. योग्य रीतीने कामकाज होत नाही, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणाची सुनावणी होत आहे, परंतु अजूनही आयोगाच्या हातात काही नाही. पुढील सुनावणी आता 19 ऑक्टोबरला आहे.
मंदिरांना NSG सुरक्षा द्या
देशातली पाच महत्त्वाच्या मंदिरांवर हल्ला करून देशामध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मला मिळाली आहे. हिंदू धर्मियांच्या मतांचं केंद्रीकतरण करून आगामी लोकसभा निवडणुका जिंकण्याचा सत्ताधारी पक्षाचा डाव असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडतर यांनी केला आहे.
(हेही वाचा: होता-होता राहून गेला शिंदे-राऊतांचा ‘सामना’; मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाने एकच हास्यकल्लोळ )