घरराजकारणनाशिकची जागा कोणाची हे माहीतच आहे; तांबेंच्या विजयानंतर मुख्यमंत्र्यांकडून सूचक विधान

नाशिकची जागा कोणाची हे माहीतच आहे; तांबेंच्या विजयानंतर मुख्यमंत्र्यांकडून सूचक विधान

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिंचवड येथे आज विविध समाजातील शिष्टमंडळाशी चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी देखील संवाद साधला तसेच नाशिक शिक्षक मतदार संघाबाबत बोलत सूचक विधान देखील केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज चिंचवडमध्ये दाखल झाले. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज अनेक समाजातील शिष्टमंडळाशी चर्चा केली. तसेच प्रसार माध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी त्यांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक आपणंच जिंकणार असा विश्वास देखील व्यक्त केला. तसेच शिक्षण पदवीधर मतदार संघात विजयी झालेले आमदार सत्यजित तांबे यांच्याबाबत देखील सूचक विधान केले. नाशिकची जागा कोणाची आहे हे तुम्हाला माहीतच आहे, असे मुख्यमंत्र्यांकडून यावेळी सांगण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जरी शिक्षक मतदारसंघामध्ये जागा आल्या नाही तरी ग्रामपंचायत निवडणुकीतील ट्रेंड पाहता जनतेचा युतीला पाठिंबा दिसून येतो. कोकणातील जागा युतीने जिंकली तर नाशिकची जागा कोणची आहे, हे तुम्हाला माहीतच आहे, असे म्हणत त्यांनी नाशिकची जागा युतीचीच आहे, असे अप्रत्यक्ष विधान केले आहे. सत्यजित तांबे यांनी नाशिकमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण तांबेंना भाजप आणि शिंदे गटाकडून पाठिंबा देण्यात आला होता.

- Advertisement -

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, काही विषय होते ज्याच्यावर आज अनेक चर्चा करण्यात आल्या. अनेक शिष्टमंडळे भेटली. समोरासमोर चर्चा झाली. काही विषय हे लवकर सुटण्यासारखे आहेत. हे सरकार सकारात्मक आहे आणि याच्यावर नक्की विचार होईल.

तर ब्राह्मण समाजच्या नाराजीबाबत देखील त्यांनी मत व्यक्त करताना म्हंटले की, कोणीही नाराज नाही. ब्राह्मण समाज निवडणूकीचे काम करतोय. काही वातावरण विरोधकांनी तयार केले आहे. तसे बॅनर विरोधकांनी लावले. निवडणूक आहे, आचारसंहिता सुरु आहे त्यामुळे आम्ही काही बोलणार नाही. हा मतदार संघ हा युतीचा मतदारसंघ आहे. युतीचा बालेकिल्ला आहे. लोकांनी जो काही पाठिंबा युतीच्या हेमंत रासने यांना जो पाठिंबा दिला आहे, त्यावरून मतदारांचा कल दिसून येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी 20 हजार कोटी रुपयांचा निधी

अजित दादा असूद्यात नाही तर दुसरं कोणी असूद्यात मतदार ठरवत असतात कोणाला जिंकवायचे आणि कोणाला पराभूत करायचं. आम्हाला विश्वास आहे. राज्यात युतीचे सरकार स्थापन झाले आहे. जितके फास्ट आम्ही निर्णय घेतोय. तसेच केंद्र सरकारचे पाठबळ ज्या पद्धतीने मिळतंय त्यामुळे लोकांना विश्वास निर्माण झालेला आहे की, जिल्ह्याचा कायापालट होईल, जे प्रश्न प्रलंबित आहेत, ते सुटतील. शेवटी सत्ताधारी पक्षावर विश्वास असतो. लोक उलट प्रवास करत नाही, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -