घरराजकारणजितेंद्र आव्हाड यांची फेसबुकवर भावनिक पोस्ट; म्हणाले... "मी तिच्या जन्मानंतर साधं बोटही...

जितेंद्र आव्हाड यांची फेसबुकवर भावनिक पोस्ट; म्हणाले… “मी तिच्या जन्मानंतर साधं बोटही कधी लावलं नाही”

Subscribe

जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आणि जावयाला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापलेले आहेत. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांना लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. याबाबतची एक भावनिक पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या फेसबुकला केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर आव्हाड चांगलेच संतापलेले आहेत. या दोघांना जीवे मारण्याबाबतचा एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये आव्हाड यांच्या जावयाला आणि मुलीला कशा पद्धतीने मारण्यात येईल, त्यासाठी कसे प्लॅनिंग करायचे हे बोलताना एका व्यक्तीचा आवाज येत आहे. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या फेसबुकला एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “ज्या नताशाला मी तीच्या जन्मानंतर साधं बोटही कधी लावलं नाही. किंवा ओरडलोही नाही. तीच्याबद्दल एक व्यक्ती फिल्डींग लावून मारुन टाकेन हे बोलतो. तेव्हा प्रचंड राग येतो. अस्वस्थता येते. तुम्हीच मला सांगा एक राजकीय नेता म्हणून हे सगळं सहन करायचं. एक पिता म्हणून हे सगळं सहन करायचं. आणि भूमिका काय घ्यायची ? घाबरुन घरी बसायचं, का उघडपणाने मैदानात यायचं.”

- Advertisement -

याचं पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहिले आहें की, “कोण आहे बाबाजी ? बाबाजी म्हणजे दाऊद इब्राहीमचा हस्तक. जे. जे. हत्या शुटआऊटमधील पहिल्या पाच जणांमधील एक आरोपी. स्वत:चं मुंबईमध्ये प्रचंड नाव असलेला. त्याच्या हस्तकांकरवी जावयाचा आणि मुलीचा मर्डर होणार. हे ऐकल्यानंतर एका बापाला काय वाटल असेल. राजकारण बाजूला ठेवा. पण, कधीतरी ह्या गोष्टीचा देखील विचार करा.”

तिहार तुरुंगात असलेला कुख्यात गुंड सुभाष सिंह ठाकूर उर्फ बाबाजी याला जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याचे आदेश देत असल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश अहिर यांच्या नावाचा उल्लेख होता. यानंतर महेश अहिर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर घटनेनंतर आव्हाड यांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला होता.

- Advertisement -

हेही वाचा – शनिवार, रविवारी रेल्वेचा विशेष ब्लॉक; लोकलच्या अशंत: फेऱ्या रद्द

जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला राज्य सरकारने सुरक्षा द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. तर विरोधी पक्षनेते यांनी याबाबत संताप व्यक्त करत, अशा पद्धतीने जर का विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न होत असेल तर महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही, असे मत व्यक्त केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -