घरकर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३Karnataka Election Results 2023: कर्नाटकातील काँग्रेसचे 'संकटमोचक'; जाणून घ्या कोण आहेत डीके...

Karnataka Election Results 2023: कर्नाटकातील काँग्रेसचे ‘संकटमोचक’; जाणून घ्या कोण आहेत डीके शिवकुमार?

Subscribe

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत अनेक नेते चर्चेत होते, पण सर्वात जास्त चर्चेत असलेलं एक नाव म्हणजे डीके शिवकुमार. ते कोण आहेत आणि ते चर्चेत का आहेत याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. डिके शिवकुमार हे कर्नाटकातील काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत अनेक नेते चर्चेत होते, पण सर्वात जास्त चर्चेत असलेलं एक नाव म्हणजे डीके शिवकुमार. ते कोण आहेत आणि ते चर्चेत का आहेत याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. डिके शिवकुमार हे कर्नाटकातील काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत.( Karnataka assembly elections 2023 DK Shivakumar is in race of CM post know who is he )

डीके शिवकुमार सध्या कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ते गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे नेते आहेत. डीके शिवकुमार हे कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारही आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांची सिद्धरमय्या यांच्याशी लढत आहे. डीके शिवकुमार हे राजकारणी तर आहेतच सोबतच ते एक शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. 2006 मध्ये कर्नाटक स्टेट ओपन युनिव्हर्सिटी म्हैसूर येथून त्यांनी राज्यशास्त्रातील मास्टर ऑफ आर्ट्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

- Advertisement -

कनकपुरा मतदारसंघातून नऊ वेळा आमदार

यावेळीही ते त्यांचा मतदारसंघ कनकपुरा येथून निवडणूक लढवत होते. त्यांचा मतदारसंघ याचसाठी कारण ते येथून आठ वेळा आमदार झाले आहेत. कनकपुरा येथे ते भाजप सरकारमध्ये महसूल मंत्री असलेले आर अशोक यांच्या विरोधात होते. तब्बल 22 वर्षांनंतर कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येणार आहे. कर्नाटकात काँग्रेसने सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे.

काँग्रेससाठी संकटमोचक

डीके शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसमधील सर्वात श्रीमंत नेते आहेत. त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्याकडे 840 कोटींहून अधिक संपत्ती आहे. जेव्हा-जेव्हा काँग्रेस पक्षाला निधीची गरज भासते, तेव्हा शिवकुमार तिथे उभे राहतात, म्हणजेच ते पक्षासाठी एक प्रकारे संकटमोचकची भूमिका बजावत आहेत. मात्र, ते सीबीआय, ईडी आणि प्राप्तिकर विभागाच्या चौकशीतही सापडले आहेत. निवडणुकीपूर्वी 104 दिवस ते तुरुंगात होते. आता ते जामिनावर बाहेर आले आहेत.

- Advertisement -

काँग्रेसने आघाडी घेतली

कर्नाटकातच 224 जागांवर मतमोजणी सुरु आहे. यामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत आहे. काँग्रेसने स्पष्ट बहुमताचा आकडा पार केला आहे. काँग्रेस सध्या 137 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 63 जागांवर आघाडीवर असून दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर जेडीएस 20 जागांवर पुढे आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होत आहे.

( हेही वाचा: भारत जोडो यात्रेचा पहिला ‘परिणाम’; मल्लिकार्जुन खरगेंच्या अध्यक्षतेत कर्नाटकात काँग्रेसचा मोठा विजय )

2018 मध्ये कोणालाही बहुमत मिळाले नाही

2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जनतेने कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. मागच्या वेळीही ही लढत तिरंगी होती म्हणजेच भाजप, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यातली लढत होती, पण निकाल लागल्यावर आम्हाला मताधिक्य मिळाले. गेल्या वेळी भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. त्यांचे 104 आमदार होते. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसच्या 78 जागा होत्या, तर जेडीएसच्या खात्यात 37 जागा होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -