Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर राजकारण कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३ Karnataka Election 2023 : नफरत के आगे हमेशा..., जितेंद्र आव्हाड यांचा भाजपावर...

Karnataka Election 2023 : नफरत के आगे हमेशा…, जितेंद्र आव्हाड यांचा भाजपावर निशाणा

Subscribe

मुंबई : कर्नाटकमध्ये सत्तांतर होणार हे स्पष्ट झाले. 123 जागा जिंकत काँग्रेसने बहुमताचा जादुई आकडा पार केला आहे. शिवाय, 13 मतदारसंघात आघाडीवर आहे. तर, आतापर्यंत सत्तेवर असलेल्या भाजपाला 56 जागा मिळाल्या असून 8 मतदारसंघात आघाडीवर आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, नफरत के आगे हमेशा प्यार ही जीतता है…, अशी प्रतिक्रिया देत भाजपावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र ही चार राज्ये भाजपाने खोक्यांचा वापर, तसेच केंद्रीय यत्रणेंच्या दहशतीचा वापर करून पाडली. परंतु कर्नाटकच्या विजयाने सिद्ध झाले की, लोकांना सूडाचे राजकरण आवडत नाही आणि त्यामुळेच कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमत देत भाजपाच्या ‘खरेदी विक्री’च्या धोरणाला मूठमाती दिली आहे, हाच या विजयाचा अन्वयार्थ आहे, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – भाजपाच्या The Karnataka Story चा The End; दक्षिणेचे दरवाजे झाले बंद

- Advertisement -

आज सामान्य जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहे. परंतु यावर काहीच न बोलता, द्वेष आणि फक्त द्वेष पसरवण्याचे काम सत्ताधारी गटाकडून सुरू आहे. पैशांचा वारेमाप वापर करून, प्रसंगी केंद्रीय यत्रणांना हाताशी धरून सत्तेचा जो माज सत्ताधारी गटाला चढला होता, तो माज सामान्य जनतेच्या नजरेत खुपत होता. लोकांनी आपला हा राग मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त केला असल्याचे सांगत आमदार आव्हाड यांनी भाजपावर टीका केली आहे.

इतिहास ये दोहराता है की, नफरत के आगे हमेशा प्यार ही जीतता है… तुम नफरत फैलाव, हम प्यार ही बाटेंगे…, असेही त्यांनी ट्विटरवरून भाजपाला सुनावले आहे.

हेही वाचा – कर्नाटकात जेडीएसमुळे कॉंग्रेसची मुसंडी, आमची मते शाबूत; देवेंद्र फडणवीसांचा दावा

- Advertisment -