Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर राजकारण कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३ Karnataka Election Result 2023: कर्नाटकात सत्तांतराची शक्यता; काँग्रेस आघाडीवर

Karnataka Election Result 2023: कर्नाटकात सत्तांतराची शक्यता; काँग्रेस आघाडीवर

Subscribe

कर्नाटक विधानसभेचे कल हाती येत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र दिसत आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 197 जागांमधील काँग्रेस 100 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप 68 जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएस 24 जागांवर आघाडीवर आहे. तसचं, एबीपी माझाच्या आकडेवारीनुसार, काँग्रेस 110, भाजप 80 तर जेडीएस 29 जागांवर आघाडीवर आहेत.

कर्नाटक विधानसभेचे कल हाती येत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र दिसत आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 197 जागांमधील काँग्रेस 100 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप 68 जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएस 24 जागांवर आघाडीवर आहे. तसचं, एबीपी माझाच्या आकडेवारीनुसार, काँग्रेस 110, भाजप 80 तर जेडीएस 29 जागांवर आघाडीवर आहेत. ( Karnataka Election Result 2023 Possibility of power transfer in Karnataka Congress in front )

तर काही ठिकाणी भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे बेळगावमध्येही काँग्रेसचे उमदेवार आघाडीवर आहेत.

- Advertisement -

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरु झाली. आधी पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर ईव्हीएम मशीन उघडण्यात आल्या. त्यानंतर अवघ्या 45 मिनिटांतच पहिल्या फेरीचे कल समोर आले आहेत. या कलामध्ये काँग्रेसची आघाडी असल्याचं समोर येत आहे. दुपारपर्यंत असेच चित्र राहिलं तर कर्नाटकता काँग्रेसचीच सत्ता येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्ता कोणाच्या हातात देणार हे आज ठरणार आहे. भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: कर्नाटकातील सत्ताबदल काँग्रेससाठी संजीवनी ठरणार? राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता )

2 हजार 615 उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीत बंद

विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 2 हजार 615 उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये 2 हजार 430 पुरुष तर 184 महिला उमेदवार आणि एक तृतीयपंथी उमेदवार निवडणुकीच्या रिगंणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य 10 मे रोजी मतदान पेटीत बंद झालं होतं. त्यानंतर आता 13 मे रोजी मतमोजणी होत आहे. त्यानुसार निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे स्पष्ट होणार आहे.

- Advertisment -