Karnataka Election Result: महाराष्ट्र एकीकरण समितीची यंदाही पिछाडी; निपाणीत राष्ट्रवादी आघाडीवर

महाराष्ट्र एकीकरण समितीचा यंदाच्या निवडणुकीतला पराभव निश्चित मानला जात होता. त्यांचा 2018 प्रमाणे याही निवडणुकीत पुन्हा पराभवचं होत असल्याचं दिसत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये एकही समितीचा एकही उमेदवार आघाडीवर आलेला दिसत नाही, तर बेळगाव जिल्ह्यातील 18 मधील 13 मतदारसंघावर काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत. निपाणी मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांनी आघाडी घेतली आहे.

Karnataka Election Result Maharashtra Integration Committee lags behind this year too Nationalist alliance in Nipani Congress in border areas with Belgaum
Karnataka Election Result Maharashtra Integration Committee lags behind this year too Nationalist alliance in Nipani Congress in border areas with Belgaum

बेळगाव: कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कर्नाटक विधानसभेच्या निकालात काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच टक्कर पाहायला मिळत आहे. तर कर्नाटक विधानसभा निकालाचे सुरुवातीचे कल जाहीर झालेत त्यात काँग्रेसच आघाडीवर दिसत आहे. एकीकडे असा जल्लोष असताना मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीचा यंदाच्या निवडणुकीतला पराभव निश्चित मानला जात होता. त्यांचा 2018 प्रमाणे याही निवडणुकीत पुन्हा पराभवचं होत असल्याचं दिसत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये एकही समितीचा एकही उमेदवार आघाडीवर आलेला दिसत नाही, तर बेळगाव जिल्ह्यातील 18 मधील 13 मतदारसंघावर काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत. निपाणी मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांनी आघाडी घेतली आहे. ( Karnataka Election Result Maharashtra Integration Committee lags behind this year too Nationalist alliance in Nipani Congress in border areas with Belgaum )

( हेही वाचा: कर्नाटकातील सत्ताबदल काँग्रेससाठी संजीवनी ठरणार? राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता )

कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्ता कोणाच्या हातात देणार हे आज ठरणार आहे. भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे.

2 हजार 615 उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीत बंद

विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 2 हजार 615 उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये 2 हजार 430 पुरुष तर 184 महिला उमेदवार आणि एक तृतीयपंथी उमेदवार निवडणुकीच्या रिगंणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य 10 मे रोजी मतदान पेटीत बंद झालं होतं. त्यानंतर आता 13 मे रोजी मतमोजणी होत आहे. त्यानुसार निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे स्पष्ट होणार आहे.