कर्नाटकातील सत्ताबदल काँग्रेससाठी संजीवनी ठरणार? राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

कर्नाटकातील सत्तापरिवर्तन हे काँग्रेससाठी 'संजीवनी' ठरणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका पाहता विरोधी पक्षांच्या एकजुटीवरही याचा परिणाम दिसून येईल.

Karnatka election result 2023 Change of power in Karnataka will be a lifesaver for Congress Will political equations change
Karnatka election result 2023 Change of power in Karnataka will be a lifesaver for Congress Will political equations change

कर्नाटकात यावेळी कोणाचे सरकार स्थापन होणार? एक्झिट पोलचे संमिश्र परिणाम दिसून येत आहेत. अशा स्थितीत कर्नाटकाचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राजकारणात २४ तासांत समीकरणं बदलतात. मात्र, कर्नाटकचा इतिहास असा आहे की, 1985 पासून कोणत्याही पक्षाला सलग दुसऱ्यांदा सरकार बनवता आलेले नाही. त्यामुळे जर सत्ताबदलाचा हा क्रम कायम राहिला तर काँग्रेससाठी ही आनंदाची बातमी आहे. कर्नाटकातील सत्तापरिवर्तन हे काँग्रेससाठी ‘संजीवनी’ ठरणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका पाहता विरोधी पक्षांच्या एकजुटीवरही याचा परिणाम दिसून येईल. ( Karnatka election result 2023 Change of power in Karnataka will be a lifesaver for Congress Will political equations change )

कर्नाटक हे काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांचे गृहराज्य आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी राज्यातील पक्षाच्या विजयाचा प्रतीकात्मक अर्थही असेल. हे नाकारता येणार नाही. कर्नाटकात लोकसभेच्या 28 जागा आहेत, ज्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कर्नाटकात सध्या भाजपचे 25 लोकसभेचे खासदार आहेत, तर काँग्रेसचे फक्त 2 लोकसभेचे खासदार आहेत. कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आल्यास या संख्येत मोठे फेरबदल होऊ शकतात.

सध्या काँग्रेसची अवस्था बिकट आहे. गेल्या काही वर्षांत हिमाचल सोडून गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसची अवस्था अशी आहे की विरोधी आघाडीत सामील करून घेण्यासही अनेक पक्ष टाळाटाळ करत आहेत. अशा स्थितीत कर्नाटक निवडणूक ही काँग्रेससाठी करो वा मरो अशी स्थिती आहे. कर्नाटकात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. या लढतीत काँग्रेसने भाजपवर मात केल्यास राष्ट्रीय राजकारणात त्यांना काहीसा महत्त्व प्राप्त होईल.

( हेही वाचा: कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात; कुणाचे सरकार येणार? )

कर्नाटकात सत्ता वाचवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रचारात पूर्ण जोर लावला आहे. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा आणि अमित शहा यांनी पुढाकार घेतला. तर दुसरीकडे सोनिया गांधींनाही प्रचारासाठी मैदानात उतरावे लागले. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही कर्नाटकात प्रचार केला. आता आज, 13 मे रोजी होणाऱ्या कर्नाटक निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.