Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर राजकारण कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३ मला आधी मुख्यमंत्री करा, मग सिद्धरामय्यांना करा; डी के शिवकुमारांची मागणी!

मला आधी मुख्यमंत्री करा, मग सिद्धरामय्यांना करा; डी के शिवकुमारांची मागणी!

Subscribe

 

कर्नाटकः मला पहिली अडीच वर्षे कर्नाटकचा मुख्यमंत्री करा मग सिद्धरामैया यांना पुढीच अडीच वर्षे मुख्यमंत्री करा, अशी अट डी के शिवकुमार यांनी कॉंग्रेस हायकमांडकडे टाकली असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री पदाचीही ऑफर देण्यात आली होती. त्यासही त्यांनी नकार दिल्याचे समजते.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाला. कर्नाटकच्या जनतेने कौल देत कॉंग्रेसकडे एकहाती सत्ता दिली. त्यानंतर शिवकुमार हेच कर्नाटकचे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा सुरु झाली. ही चर्चा सुरु असताना सिद्धरामैया यांचे नावही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पुढे आले. या दोन जेष्ठ नेत्यांपैकी कोणाला कर्नाटकचा मुख्यमंत्री करावे यासाठी कॉंग्रेस हायकमांडची बैठक झाली. या बैठकीत दोघांनाही अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री करावे, असा तोडगा काढण्यात आला. तसेच शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री करावे असाही पर्याय ठेवण्यात आला.

यावर शिवकुमार यांनी आपली भूमिका स्पष्ट केले असल्याचे बोलले जात आहे. मला उपमुख्यमंत्रीपद नको. मला पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्री करा, मग सिद्धरामैया यांना मुख्यमंत्री करा, असे शिवकुमार यांनी कॉंग्रेस हायकमांडला कळवल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता कॉंग्रेस हायकमांड आता नव्याने बैठक घेऊन मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेणार आहे, असे समजते.

- Advertisement -

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला १३६ जागा मिळाल्या आहेत. भाजपला ६५, जनता दल सेक्युलरला १९, कल्याणा राज्य प्रगती पक्ष १ आणि सर्वोदय कर्नाटका पक्षाचा १ उमेदवार निवडून आला आहे. दोन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. दोन दशकानंतर कॉंग्रेसच्या पदरी कर्नाटकची एकहाती सत्ता आली आहे.

कॉंग्रेसच्या विजयाचे खरे मानकरी कर्नाटकी जनता आहे. त्यामुळे कर्नाटकी जनतेचे आभार आणि अभिनंदन. कॉंग्रेसचे सर्व कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी यांचाही हा विजय आहे. त्यांचेही अभिनंदन. गरीब ताकदीने धनाढ्य शक्तीला हरवले आहे. नफरत की बाजार बंद और मोहब्बत की दुकान शुरू, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर दिली. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी ट्वीट करुन कॉंग्रेसचे अभिनंदन केले. कॉंग्रेसने आता जनतेची कामे करावीत, असा सल्लाही पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेसला दिला.

- Advertisment -