संजय राऊत तर अर्धेच शिवसैनिक, शिंदे गटाचे जोरदार टीकास्त्र

eknath shinde group spokeperson deepak kesarkar apologize sharad pawar for controversial statement

मुंबई : शिवसेनेती दोन गटांमधील दरी वाढतच चालली आहे. शिंदे गटाने बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला असला तरी, या गटाचे मुख्य लक्ष्य शिवसेनेचे खासदार संजय राऊतच आहेत. आता संजय राऊत हे अर्धेच शिवसैनिक असल्याची टीका शिंदे गटाने केली आहे.

शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकावणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य आमदार गुवाहाटीत असताना संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापरही केला होता. हे आमदार मुंबईत आल्यानंतर त्यांनी त्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. संजय राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना संपवायची सुपारी घेतली असल्याचा आरोप काही आमदारांनी केला होता.

हेही वाचा – सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस आक्रमक, उद्या मुंबई-नाशिकमध्ये आंदोलन

तर, आज शिंदे गटाचे प्रवक्ते यांनी संजय राऊत हे अर्धेच शिवसैनिक असून अर्धे राष्ट्रवादीचे आहेत. केवळ बाळासाहेबांवर प्रेम असण्याने कुणी शिवसैनिक होत नाही, अशी टिप्पणी केली आहे. आम्ही कधीही मातोश्री आणि शिवसेना भवनावर दावा केलेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संघटनेच्या निमित्ताने जोडले जाणे, हाच आमचा सन्मान आहे, असे ते म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीची महत्तता राखली पाहिजे. पक्षात एकटा राहिलो तरी, काँग्रेससोबत जाणार नाही, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. आम्ही त्यांचेच विचार घेऊन पुढे जात आहोत. आपण काँग्रेससमोर झुकायचे का, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे, असे केसरकर म्हणाले.

हेही वाचा – भूषण गगराणी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव