घरराजकारणLoksabha 2024: अजूनही वेळ गेलेली नाही, उमेदवार बदला; हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवर...

Loksabha 2024: अजूनही वेळ गेलेली नाही, उमेदवार बदला; हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवर भाजपा नाराज

Subscribe

हिंगोली: हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीसाठी महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. भारतीय जनता पक्षाने करून घेतलेल्या विविध सर्वेक्षणामध्ये खासदार हेमंत पाटील यांच्यावर मतदार संघात मोठी नाराजी असल्याचे भारतीय जनता पक्षातर्फे सतत सांगण्यात येत होते. यामुळे अनेक इच्छुकांनी ऐनवेळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतरही हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावर भाजपाने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचचं चित्र आहे. (Loksabha 2024 Time is not over yet change candidates BJP is upset about Hemant Patil s candidature)

हेमंत पाटील यांचा फोन बऱ्याच वेला स्विच ऑफ असतो हे आम्ही अनेक वेळा अनुभवले. याशिवाय त्यांच्याबद्दल मतदारसंघांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे आताही वेळ आहे. शिवसेनेने हिंगोली लोकसभेसाठी हेमंत पाटील यांना जी उमेदवारी दिली ती मागे घ्यावी, अशी प्रतिक्रिया माजी खासदार आणि भाजपा नेते शिवाजी माने यांनी दिली आहे.

- Advertisement -

शिवाजी माने म्हणाले की, लोक असं म्हणतात, किती फोन केले , तरी कधीही फोन उचलत नाहीत. त्यांचा फोन बऱ्याचदा स्विच ऑफ असतो, हे आम्ही सुद्धा अनुभवले आहे. त्यांच्याविषयी लोकांच्या मनात ही नाराजी आहे. आम्ही याबाबत वेळोवेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे. आजही दोघांनाही मी एसएमएस केला आहे. मुख्यमंत्र्यांनासुद्धा SMS केला आहे, संपर्क नेते आनंद जाधव यांना सुद्धा SMS केल्याचं त्यांनी सांगितलं.

उमेदवार बदला नाहीतर जागा भाजपाला द्या

शिवाजी माने म्हणाले, आम्हीही या जागेवर दावा करत होतो, आम्ही या जागेवर यामुळेच दावा करत होतो की, त्यांच्याबद्दल असलेली नाराजी आहे, त्यामुळे याचं रुपांतर विजयामध्ये होत नाही म्हणून आम्ही वरिष्ठांना हे सांगत होतो, तुमचा उमेदवार बदला किंवा जागा भाजपाला द्या.

- Advertisement -

(हेही वाचा: Lok Sabha 2024 : भाजपची 11 उमेदवारांची आठवी यादी जाहीर; सनी देओलचे तिकीट रद्द )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -