Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai
HomeराजकारणLokSabha : काँग्रेस - 'आप'चे ठरले; दिल्ली - चंदीगडसह 5 राज्यांमध्ये युती

LokSabha : काँग्रेस – ‘आप’चे ठरले; दिल्ली – चंदीगडसह 5 राज्यांमध्ये युती

Subscribe

मुंबई : इंडिया आघाडीत झालेली उलथापालथ पाहता लोकसभा निवडणूक होईपर्यंत तरी ही आघाडी टिकते की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, इंडिया आघाडीसाठी चांगली बातमी आहे. आता लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेसमध्ये एकमत झाले आहे. या दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत दिल्ली, गुजरात, चंदीगड, गोवा आणि हरियाणा येथील जागांसाठी युती जाहीर केली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, उत्तर प्रदेशात युतीची अधिकृत घोषणा झाली आहे. ते अंतिम व्हायला वेळ लागला. दरम्यान, पंजाबमध्ये आप एकट्यानेच निवडणूक लढवणार आहे.

दिल्लीत 4-3 चा फॉर्म्युला

दिल्लीत 23 फेब्रुवारी रोजी AAP आणि काँग्रेस यांच्यात बैठक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांनी दिल्लीतील लोकसभेच्या 7 जागांसाठी 4-3 चा फॉर्म्युला तयार केला आहे. काँग्रेस तीन जागा लढेल. यात चांदनी चौक, उत्तर पश्चिम आणि उत्तर पूर्व दिल्ली या जागांचा समावेश आहे. तर आप दिल्लीतील चार जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. यामध्ये नवी दिल्ली, दक्षिण दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि पूर्व दिल्लीच्या जागांचा समावेश आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्व 7 जागा जिंकल्या होत्या.

हेही वाचा – Sharad Pawar : किल्ले रायगडावर शरद पवारांच्या हस्ते ‘तुतारी’ चिन्हाचे अनावरण

लोकसभा 2024 साठी काँग्रेस आणि आपची युती अशी असेल

दिल्ली:
INC 3, AAP 4

गुजरात:
INC 24, AAP 2

हरियाणा:
INC 9, AAP 1

गोवा:
INC 2, AAP 0

चंदीगड:
INC 1, AAP 0

जानेवारीमध्ये गुजरात दौऱ्यावर असताना केजरीवाल यांनी चैत्रा वसावा यांना राज्यातील भरूच लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून घोषित केले होते. त्याप्रमाणे भरूच ‘आप’कडे, तर चांदनी चौकाची जागा काँग्रेसकडे देण्यात आली आहे. काँग्रेस नेते अहमद पटेल हे भरुच मतदारसंघातून खासदार होते. मात्र, आता ही जागा ‘आप’ला देण्यात आलेली आहे.

बंगालमध्येही ममता एकट्याने निवडणूक लढवणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. ममताही स्वत:ला इंडियाचा एक भाग म्हणवत आहे. मात्र, त्यांनी एकट्याने निवडणूक लढवण्याच्या निर्णयासाठी काँग्रेससोबत जागावाटपाची चर्चा अयशस्वी झाल्याचे कारण दिले होते.

हेही वाचा – Sanjay Raut : पवार-शिंदेंचे उमेदवार निवडणूक लढणार ‘कमळ’ चिन्हावर! राऊतांचा खळबळजनक दावा

काँग्रेस म्हणते, चर्चा सुरू आहे

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी शनिवारी सांगितले की, टीएमसीशी चर्चा सुरू आहे. भाजपला पराभूत करणे हे पहिले उद्दिष्ट असल्याचेही ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. ते म्हणाले, ‘काँग्रेस पक्षानेच ममता बॅनर्जी यांना पहिल्यांदा खासदार केले. त्यांच्या पक्षाचे नाव देखील पहा. त्यात काँग्रेससोबतच तृणमूलही आहे. टीएमसीसाठी काँग्रेसचे दरवाजे नेहमीच खुले आहेत. आम्ही ममता बॅनर्जींचा आदर करतो.