घरराजकारणकाळे कपडे घालून वर्षभरात काॅंग्रेस दुसऱ्यांदा मैदानात

काळे कपडे घालून वर्षभरात काॅंग्रेस दुसऱ्यांदा मैदानात

Subscribe

काॅंग्रेस नेता राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने काॅंग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काॅंग्रेसने सत्ताधारी पक्ष भाजपला चांगलेच बोल सुनावले आहेत. तर विरोधकांनीही भाजपवर हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी यांच्या खासदारकीच्या मुद्द्यावरुन काॅंग्रेस आणि इतर विरोधी पक्ष संसद भवनात काळे कपडे परिधान करुन पोहोचले. या आंदोलनात काॅंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी याही सहभागी होताना दिसल्या. काॅंग्रेसने एखाद्या गोष्टीला विरोध करण्यासाठी काळे कपडे परिधान करुन आपला विरोध दर्शवल्याचे हे काही पहिले उदाहरण नाही. काॅंग्रेसने वर्षभरात दुसऱ्यांदा काळे कपडे परिधान करत, सत्ताधारी पक्ष भाजपविरोधात आंदोलन केले आहे.

- Advertisement -

याआधी काॅंग्रेसने ऑगस्ट 2022 मध्ये महागाई आणि बेकारीच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरले होते. सरकारचा निषेध करण्यासाठी काॅंग्रेसचे नेते काळे कपडे परिधान करुन संसदेत दाखल झाले होते आणि तिथे त्यांनी निदर्शने केली होती.

काॅंग्रेसने महागाई आणि बेकारीच्या मुद्द्यावरुन केलेल्या आंदोलनानंतर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रिया दिली होती. अमित शहा म्हणाले होते की, काळे कपडे घालून विरोध करण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी काॅंग्रेसला केला होता. काॅंग्रेस आंदोलनाच्या माध्यमातून आपला अजेंडा पूर्ण करत आहे. आज ईडीने धाड टाकली नाही, काहीही झालेले नाही तरीही काॅंग्रेसचा विरोध का? आता आंदोलन करण्याचे कारण काय? असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यावेळी केला होता.

- Advertisement -

( हेही वाचा: राहुल गांधींच्या खासदारकीवरुन काँग्रेस आक्रमक; काळे कपडे परिधान करून सरकारचा निषेध )

ऑगस्ट 2022 नंतर आता 27 मार्च 2023 ला काॅँग्रेसने पुन्हा एकदा आपला निषेध दर्शवण्यासाठी काळे कपडे परिधान केले आहेत. 27 मार्च सोमवारी, काॅंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह अनेक विरोधी पक्षांतील नेत्यांनी राहुल गांधींवर झालेल्या कारवाईविरोधात निषेध दर्शवण्यासाठी काळे कपडे परिधान करत संसदेत प्रवेश केला. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरु होताच काॅंग्रेसने राहुल गांधी यांच्या खासदारकीचा मुद्दा उपस्थित केला आणि सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -