मुंबईत होत असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला होता. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीच्या खर्चाबाबत मंत्री उदय सामंत यांनी सांगताना, मविआ नेत्यांवर टीकास्त्र डागलं. त्यावर आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतित्त्युर दिलं आहे. (Maharashtra Politics First gave calculation the 50 boxes then speak Jitendra Awhad answer to Uday Samant)
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
इंडिया बैठकीवर किती खर्च होतात हे सांगण्यापेक्षा त्यांनी 50 खोक्यांचा हिशोब आधी द्यावा, महाराष्ट्राची जनता त्याचा हिशोब तुम्हाला विचारत आहे, असं आव्हाड यावेळी म्हणाले. तसंच, ज्या तत्परतेने मनपा आमचे पोस्टर्स हटवत आहे, त्याच तत्परतेने त्यांनी हाजीअलीला लागलेले पोस्टर्स हटवावेत, असं आव्हाड यावेळी म्हणाले. देशात आणि राज्यात लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
उदय सामंत काय म्हणाले होते?
45 हजारांच्या 65 खुर्च्या या बैठकीसाठी मागवण्यात आल्या आहेत. चौदा ते पंधरा तासांच्या बैठकीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेलो होतो तेव्हा आमच्या हॉटेलचा खर्च काढणयात येत होता. ग्रँड हयातमधील एका खोलीचा दर हा 25 ते 30 हजार रुपये इतका आहे.
तर जेवणाचं एक ताटही साडेचाह हजार रुपयांचं आहे, असा धक्कादायक दावा सामंतांनी केला. त्यामुळे जे 14 तासांसाठी 65 हजार रुपयांचा खर्च करतात त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याचं, उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
यावेळी उदय सामंत यांनी 26 पक्षांची यादी दाखवली. या यादीमध्ये इंडिया आघाडीत समाविष्ट असलेले दोन महाराष्ट्रातील पक्ष हे 25 व्या आणि 26 व्या स्थानावर असल्याचे सामंत यांनी म्हटले. जी यादी हॉटेलकडे गेली आहे त्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा पक्ष 26 व्या स्थानावर आहे. तर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 व्या स्थानी आहे.” त्यामुळे महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे पक्ष हे शेवटून दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असल्याची टीका सामंतांनी केली.
(हेही वाचा: काही तासांच्या ‘INDIA’ आघाडीच्या बैठकीवर कोट्यवधी रुपयांची उधळण, उदय सामंतांची टीका )