घरराजकारणविधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसची कसोटी; पटोले, थोरात, चव्हाण यांच्यावर जबाबदारी

विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसची कसोटी; पटोले, थोरात, चव्हाण यांच्यावर जबाबदारी

Subscribe

मतांचे गणित लक्षात घेऊन कॉंग्रेसने एकजुटीने प्रयत्न केले तर  राज्यसभा निवडणुकीतील पराभवाची परतफेड करणे शक्य असल्याचे आघाडीतील नेत्यांचे म्हणणे आहे. विधान परिषद निवडणुकीत माघार घेण्यास कॉंग्रेसने नकार दिला. त्यामुळे आता दोन्ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी कॉंग्रेसवर आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत (maharashtra legislative council election) दहाव्या जागेसाठी कॉंग्रेस (congress) आणि भाजप (bjp) यांच्यात मुख्य लढत अपेक्षित असल्याने या निवडणुकीत कॉंग्रेसचे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार भाई जगताप (bhai jagtap) यांना निवडून आणण्यासाठी कॉंग्रेस नेत्यांची कसोटी लागणार आहे. विशेषतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर आहे. भाजपच्या रणनितीवर मात करण्यासाठी कॉंग्रेसला विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे.

 १० ते १२ अतिरिक्त मतांची गरज

- Advertisement -

राज्यसभा निवडणुकीत (rajyasabha elections) भाजपने सूक्ष्म आणि अचूक नियोजन करून आपली तिसरी जागा निवडून आणली. आता भाजपने आपले लक्ष विधान परिषदेची पाचवी जागा निवडून आणण्यावर केंद्रीत केले आहे. भाजपची मते फुटली नाही तर आपले पाचवे उमेदवार प्रसाद लाड (prasad lad) यांना निवडून आणण्यासाठी जवळपास १५ ते २० अतिरिक्त मतांची गरज आहे. भाजपच्या तुलनेत कॉंग्रेसला १० ते १२ अतिरिक्त मतांची गरज आहे. या मतांचे गणित लक्षात घेऊन कॉंग्रेसने एकजुटीने प्रयत्न केले तर राज्यसभा निवडणुकीतील पराभवाची परतफेड करणे शक्य असल्याचे आघाडीतील नेत्यांचे म्हणणे आहे. विधान परिषद निवडणुकीत माघार घेण्यास कॉंग्रेसने नकार दिला. त्यामुळे आता दोन्ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी कॉंग्रेसवर आहे.

अतिरिक्त मते देऊन उमेदवारांना सुरक्षित

- Advertisement -

या निवडणुकीत पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी २६ ते २७ मतांची गरज आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आपापले उमेदवार निवडून आणण्याइतपत संख्याबळ आहे. शिवसेनेचे विधानसभेत ५५ आमदार असून अनेक अपक्ष आमदार त्यांच्यासोबत आहेत.  त्यामुळे कोट्यापेक्षा अतिरिक्त मते देऊन शिवसेना आपल्या उमेदवारांना सुरक्षित करण्यास प्राधान्य देऊ शकते. मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाने  मतदान करण्यास परवानगी दिली नाही तरी राष्ट्रवादी शिवसेनेकडून अतिरिक्त मतांची व्यवस्था करू शकते. शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपमधून काही मते आणू शकतात.

या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना निवडून आणण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. विधान परिषद निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने कॉंग्रेसला आपले पहिल्या क्रमांकाचे उमेदवार हंडोरे यांना कोट्याच्या व्यतिरिक्त आणखी दोन ते तीन मते अधिक द्यावी लागतील. त्यामुळे भाई जगताप यांच्यासाठी कॉंग्रेसला १२ ते १४ मतांची व्यवस्था करावी लागणार आहे.

राज्यसभा निवडणुकीतील भाजपचे नियोजन

राज्यसभा निवडणुकीत भाजपने केलेल्या सूक्ष्म नियोजनाची माहिती समोर आली आहे. भाजपने आपल्या पहिल्या दोन उमेदवारांना पहिल्या पसंतीची ४८ मते देताना याच मतदानात धनंजय महाडिक यांच्यासाठी दुसऱ्या पसंतीची प्रत्येकी २८ मते दिली होती. पहिल्या पसंतीची मते देणाऱ्या ४८ आमदारांपैकी २० जणांनी दुसऱ्या पसंतीची मते दिली नव्हती, अशी माहिती राज्यसभेच्या मतमोजणी प्रक्रियेत सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -