शिमला – हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून पक्षांनी मोर्चेंबांधणी सुरू केली आहे. भाजपाने हिमाचल प्रदेशसाठी आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार देणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच, भाजपाचं सरकार आल्यास समान नागरी कायदा लागू करू असं आश्वासन भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात केलं आहे.
हेही वाचा – स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचे निधन
- Advertisement -
काय आहे जाहीरनामा
- हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा समान नागरी कायदा आणणार आहे. यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे.
- भाजपाचे सरकार आल्यास अन्नदाता सन्मान निधी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये दर वर्षाला देण्यात येतील.
- राज्यात आठ लाखांपेक्षा जास्त रोजगारनिर्मिती केली जाईल.
- हिमाचल प्रदेशमधील सर्व गावे रस्त्यांशी जोडली जातील.
- धार्मिक पर्यटनाला चालना देण्याकरता १२ हजार कोटींचा खर्च करू.
- राज्यात पाच नवे मेडिकल कॉलेज उभारण्यात येतील. मोबाईन वॅनची संख्या दुप्पट करण्यात येईल.
- हिम स्टार्टअप योजना राबवली जाईल. यासाठी ९०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
- सैनिकांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत दिली जाईल.
- वक्फच्या प्रॉपर्टीचा सर्वे केला जाईल.
- कर्मचाऱ्यांच्या सुविधांसाठी नवनव्या योजना जाहीर करण्यात येणार आहे. तसंच, समान वेतनही लागू करण्यासाठी पावलं उचलली जातील.
- मुख्यमंत्री शगुन योजनेअंतर्गत बीपीएल कुटुंबीयांसाठी मुलीच्या लग्नासाठी ३१ हजारांऐवजी ५१ हजार रुपये दिले जातील.
- शाळेत जाणाऱ्या सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सायकल दिली जाईल. तसंच, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कुटी दिली जाईल.
- महिलांना व्याजमुक्त कर्ज दिले जाईल. यासाठी ५०० कोटींची तरतूद केली जाईल.
- गरिबी रेषेच्या खाली असलेल्या महिलांना तीन गॅस सिलिंडर मोफत दिली जाईल.
- ३० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या गरीब महिलांना अटल पेन्शन योजना लागू करण्यात येईल.
- बारवीच्या परीक्षेत टॉप पाच हजार विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अडीच हजार रुपये मासिक शिष्यवृत्ती दिली जाईल.हेही वाचा – हिमाचल प्रदेशला 5 वर्षांनी मिळाले लोकायुक्त; मुख्यमंत्री ते शिपायांपर्यंत सर्व लोकायुक्तांच्या कक्षेत
- Advertisement -
- Advertisement -