Eco friendly bappa Competition
घर राजकारण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण शक्य नाही; पंकजा मुंडे यांचं मोठं विधान

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण शक्य नाही; पंकजा मुंडे यांचं मोठं विधान

Subscribe

पंकजा मुंडे म्हणाल्या की, मराठा आरक्षणाचा विषय सध्या महाराष्ट्रात सगळीकडे आहे. मुळात ओबीसीतून आरक्षणाची मराठा समाजाची मागणी नव्हती. त्यांची साधी, प्रामाणिक अशी मागणी होती की, आम्हाला आरक्षण द्या. त्यांच्यातील जो समाज वंचित राहिलेला आहे, मुख्य प्रवाहातून बाहेर राहिला होता. त्याला आरक्षण देण्याविषयी सर्वांची मान्यता होती.

मराठा आरक्षणाचा मुद्दा आता अधिक चर्चेत आला आहे. मराठा आंदोलक समन्वयक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी सरकारमार्फेत मोठे प्रयत्न सुरू आहेत. अशात निजामकालीन नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी दाखले देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली होती. त्यांच्या या घोषणेवरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आता एक मोठं विधान केलं आहे. सोबतच त्यांनी मुख्यमंत्र्यांनी टोलाही लगावला आहे. ( Maratha Reservation protest Reservation is not possible for Maratha s from OBC A big statement by OBC leader Pankaja Munde )

पंकजा मुंडे या सध्या शिवशक्ती परिक्रमाच्या निमित्ताने सांगलीमध्ये होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळा त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, कोणीतरी घोषणा करून आरक्षण मिळणार नाही. संविधानिक मार्गानं आरक्षण द्यावं लागतं. अशा शब्दांत माजी ग्रामविकास मंत्री तसंच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. तसंच, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी अभ्यास गट स्थापन करून योग्य तो आकडा ठरवला पाहिजे, असं मत देखील पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं.

सर्वांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा

- Advertisement -

पंकजा मुंडे म्हणाल्या की, मराठा आरक्षणाचा विषय सध्या महाराष्ट्रात सगळीकडे आहे. मुळात ओबीसीतून आरक्षणाची मराठा समाजाची मागणी नव्हती. त्यांची साधी, प्रामाणिक अशी मागणी होती की, आम्हाला आरक्षण द्या. त्यांच्यातील जो समाज वंचित राहिलेला आहे, मुख्य प्रवाहातून बाहेर राहिला होता. त्याला आरक्षण देण्याविषयी सर्वांची मान्यता होती. अगदी गोपीनाथ मुंडे असल्यापासून आत्ताच्या सर्वच नेत्यांनी याला मान्यता दिली आहे.

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, मराठा आरक्षणासाठी जे तरूण आत्महत्या करत आहेत त्यांच्याबाबत मला खूपच वाईट वाटत आहे. मी मराठा समाजच्या सर्व तरुणांना हात जोडून विनंती करते की, तुमची जी मागणई आहे ती करा, पण त्यासाठी स्वत:चा जीव वगैरे द्यायचा विचार करू नका.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण वंशज आहोत त्यांच्या विचारांनी लढण्याच्या भूमिकेतून लढा. स्वत:चा जीव देण्यासारखं लेकरांनी काम करू नये, अशा शब्दांबत पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

( हेही वाचा: पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण करणाऱ्यावर कारवाई नको; विखे पाटलांची सूचना )

- Advertisment -