घरराजकारणशहीद चंद्रशेखर हर्बोला यांचा मृतदेह 38 वर्षांनतर निवासस्थानी, श्रद्धांजली वाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

शहीद चंद्रशेखर हर्बोला यांचा मृतदेह 38 वर्षांनतर निवासस्थानी, श्रद्धांजली वाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

Subscribe

नवी दिल्ली : शहीद लान्सनायक चंद्रशेखर हर्बोला यांचे पार्थिव तब्बल 38 वर्षांनंतर उत्तराखंडमधील हल्दवानी येथील निवासस्थानी आणण्यात आले. तेव्हा त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती. सियाचीन येथील एका जुन्या बंकरमध्ये चंद्रशेखर हर्बोला यांचा मृतदेह 38 वर्षांनी सापडला.

- Advertisement -

शहीद चंद्रशेखर हर्बोला यांचे पार्थिव वस्तुत: मंगळवारी निवासस्थानी नेण्यात येणार होते. त्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाणारा रस्ता तिरंगामय करण्यात आला होता. अंत्ययात्रेसाठी फुलांनी सजवलेली गाडीही तयार करण्यात आली होती. पण खराब हवामानामुळे चंद्रशेखर हर्बोला यांचे पार्थिव मंगळवारी आणता आले नाही. ते बुधवारी निवासस्थानी आणण्यात आले. त्यावेळी जमलेल्या नागरिकांनी देशभक्तीच्या घोषणा दिल्या. पण त्यांच्या आप्तांना केवळ 10 मिनिटेच अंतिम दर्शन घेता आले. त्यानंतर लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

14 ऑगस्टला सापडला मृतदेह
जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनवर पाकिस्तान लष्कराचा डोळा होता. पण ते काही हालचाल करण्यापूर्वीच 29 मार्च 1984 रोजी ऑपरेशन मेघदूत राबून भारतीय लष्कराने त्याचा ताबा घेतला होता. त्यावेळी 19 कुमाऊं रेजिमेंटच्या 20 जवानांची एक तुकडी तिथे पाठविण्यात आली होती. तिथे गस्त सुरू असताना हिमवादळ आले आणि हे सर्व जवान त्यात दबले गेले. त्यानंतर घेतलेल्या शोधकार्यात त्यातील 15 जवानांचे शव हाती लागले. तर, उर्वरित पाचपैकी एक चंद्रशेखर हर्बोला हा जवान होता. त्यांचा मृतदेह 38 वर्षांनी 14 ऑगस्ट 2022 रोजी सापडला.

- Advertisement -

शहीद चंद्रशेखर हर्बोला यांची धाकटी मुलगी बबिता आता 42 वर्षांच्या आहेत. माझे वडील शहीद झाले तेव्हा मी खूप लहान होते. पण आता माला अभिमान वाटतो की, मी त्यांची मुलगी आहे. त्यांनी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. माझ्या वडिलांचे पार्थिव आजपर्यंत सियाचीनमध्ये आपले कर्तव्य बजावत होते, असे त्या म्हणाल्या.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -