घरराजकारणनार्वेकर, फाटक यांना एकनाथ शिदेंची भेट घेण्यासाठी पाठवणे फक्त औपचारिकताच?

नार्वेकर, फाटक यांना एकनाथ शिदेंची भेट घेण्यासाठी पाठवणे फक्त औपचारिकताच?

Subscribe

दुसरीकडे एकनाथ शिंदे सुरतमधील ज्या हाॅटेलमध्ये आहेत तेथे गुजरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. त्यामुळे नार्वेकर आणि फाटक यांना शिंदे यांची भेट घेऊन देतील की नाही याबाबत शंकाच आहे. शिंदे यांनी आपल्या बंडाचे ठिकाण सुरत निवडल्याने भाजपचा या बंडामागे हात असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेते प्रचंड खळबळ माजली आहे. शिंदे यांच्या समर्थक आमदारांची संख्या मोठी असल्याने शिवसेनेत भूकंपच झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारही धोक्यात आले आहे. विधान परिषद निवडणुकीचे मतदान सोमवारी सायंकाळी संपल्यानंतर एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे अनेक आमदार विधानभवनातून निघून गेले.

एकनाथ शिंदे सध्या सुरतमधील मेरिडीयन हॉटेलमध्ये २५ पेक्षा जास्त आमदारांसोबत आहेत. एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक सचिव मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक सूरतकडे रवाना झाले आहेत. ते मुख्यमंत्र्यांचा मेसेज त्यांना देतील किंवा फोनवर त्यांचे मुख्यमंत्र्यांची बोलणे करून देतील. मात्र, नार्वेकर आणि फाटक सुरतकडे निघाल्याच्या आधी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. या बंडाची दखल घेत एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. सेनेने शिंदेंवर कारवाई केल्याने एक प्रकारे शिंदे यांंना मोठा इशाराच दिल्याचे दिसते. मग त्यानंतर नार्वेकर यांना शिंदे यांची भेट घेण्यासाठी पाठवण्याचे कारण काय असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. फक्त चर्चेची औपचारिकता म्हणून ही भेट आहे का अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

विधिमंडळ गटनेते पदावरून हकालपट्टी केल्यानंतर सोमवारी रात्रीपासून नाॅट रिचेबल असलेल्या एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवील आनंद दिघे यांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,  असे ट्टिट शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे नेतेपदावरून हकालपट्टी केल्याचे त्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर आता नार्वेकर आणि फाटक त्यांची भेट घेण्यासाठी सुरतकडे रवाना झाले असले तरी शिंदे त्यांना कितपत प्रतिसाद देतात याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.

दुसरीकडे एकनाथ शिंदे सुरतमधील ज्या हाॅटेलमध्ये आहेत तेथे गुजरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. त्यामुळे नार्वेकर आणि फाटक यांना शिंदे यांची भेट घेऊन देतील की नाही याबाबत शंकाच आहे. शिंदे यांनी आपल्या बंडाचे ठिकाण सुरत निवडल्याने भाजपचा या बंडामागे हात असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मोठ्या पोलीस बंदोबस्तात असलेले शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार यांच्याशी नार्वेकर आणि फाटक यांची भेट होण्याची चिन्हे कमी आहेत.

- Advertisement -

याआधी कर्नाटकमधील काँग्रेसचे सरकार उलथवून भाजपने सत्ता स्थापन केली होती. यावेळी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना भाजपने मुंबईतील हाॅटेलमध्ये ठेवले होते. यावेळी हे आमदार मोठ्या पोलीस बंदोबस्तात होते.  त्यावेळी राज्यात भाजपचे सरकार होते. त्यामुळे हाॅटेलच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या हाॅटेलवर धडक देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. आताही तशीच परिस्थिती आहे. गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे आणि महाराष्ट्रात भाजपला काहीही करून सत्ता स्थापन करायची आहे. त्यामुळे एकनाथ शिंंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांपर्यंत पोहोचणे शिवसेनेला कठीणच आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -