घरराजकारणकुठे आणून ठेवलीय बाळासाहेबांची शिवसेना! मनसेची टीका

कुठे आणून ठेवलीय बाळासाहेबांची शिवसेना! मनसेची टीका

Subscribe

मुंबई : जवळपास 50 आमदारांनी बंड केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. त्यामुळे उद्या बहुमत चाचणी घेण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. मात्र त्याआधी आज मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याची मागणीवरून शिवसेना सत्तेतून बाहेर पडू शकते, असाही तर्क लढविला जात आहे. त्यावरून मनसेने टीका करताना, कुठे आणून ठेवलीय बाळासाहेबांची शिवसेना, असे म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास 50 आमदारांनी सत्ताधारी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे अल्पमतात आलेल्या सरकारने आता बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी भाजपाने राज्यपालांकडे काल रात्री उशिरा केली. त्यानुसार आता उद्या ठाकरे सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. पण तत्पूर्वी आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी लावून धरण्याची शक्यता आहे आणि त्याला काँग्रेसकडून विरोध होईल. त्यानंतर याच मुद्द्यावरून शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल, अशी शक्यता आहे.

- Advertisement -

त्यावरून मनसेने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. संभाजी नगरच्या नामांतराचा ‘आव आणायचा आणि आपले हिरवे प्रेम हेच खरे हिंदुत्व हे सिद्ध करायचे, त्यानंतर राजीनामा द्यायचा, अशी ‘स्क्रीप्ट‘ ठरली आहे, असे सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी, कुठे आणून ठेवलीये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना?, असा सवाल केला आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -