घरराजकारण'आता हे खरं उखाड दिया, हिंदुत्वाचं ढोंग नाही, Result देणारं हिंदुत्व'; मनसेचा राऊतांना टोला

‘आता हे खरं उखाड दिया, हिंदुत्वाचं ढोंग नाही, Result देणारं हिंदुत्व’; मनसेचा राऊतांना टोला

Subscribe

अमेय खोपकर यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरुन ट्वीट करत, राऊतांना टोला लगावला आहे. खोपकर यांनी माहिम येथील मजारीवर झालेल्या कारवाईचा फोटो ट्वीट करत, काही जण एका महिलेच्या घरावरती हाथोडा चालवून मर्दपणा दाखवत होते, आता हे खरं उखाड दिया आहे.

राज ठाकरे यांनी बुधवारी, शिवाजी पार्क येथे घेतलेल्या सभेत माहिमच्या खाडीत अनधिकृत मजार असल्याचे म्हणत सरकारला कारवाईसाठी एक महिन्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर सरकारने तत्काळ कारवाई करत, अनधिकृत बांधकाम हटवले. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच आता याच मुद्यावरुन मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

अमेय खोपकर यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरुन ट्वीट करत, राऊतांना टोला लगावला आहे. खोपकर यांनी माहिम येथील मजारीवर झालेल्या कारवाईचा फोटो ट्वीट करत, काही जण एका महिलेच्या घरावर हाथोडा चालवून मर्दपणा दाखवत होते, आता हे खरं उखाड दिया आहे.

- Advertisement -

जेव्हा मविआ सरकार होते तेव्हा बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिच्या घरावर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेकडून बुल्डोजर चालवला होता. त्यानंतर त्यावर देख उखाड दिया अशी प्रतिक्रिया दिली होती. आता खोपकर यांनी त्यांच्या याच वक्तव्यावर टोला लगावत खरं उखाड दिया काय असतं ते ट्वीट करत सांगितले आहे. या ट्वीटला त्यांनी हिंदुत्वाच ढोंग नाही, Result देणारं खरं हिंदुत्व, असं कॅप्शन दिलं आहे.

- Advertisement -

 

मजारीवरील कारवाईनंतर मनसेची प्रतिक्रिया 

राज ठाकरेंनी हा मुद्दा उचलला होता. अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला कोणत्याही प्रकारे थारा द्यायला नको. प्रशासनाने ज्या तत्परतेने कारवाई केली, आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. पण मागच्या दोन वर्षांत ज्याप्रकारे अक्षम्यरीत्या या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले. मविआच्या काळात ज्याप्रकारे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष झाले, हा संशोधनाचा विषय आहे, अशी खोचक टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

( हेही वाचा: सभेनंतर राज ठाकरेंविरोधात पुण्यात तक्रार दाखल; काय आहे प्रकरण? )

काय म्हणाले होते राज ठाकरे?

राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा बुधवारी सायंकाळी शिवाजी पार्क येथे झाला. या सभेत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात माहीमच्या समुद्रातील अनधिकृत बांधकामाचा उल्लेख केला होता. राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर अवघ्या काही तासांतच कारवाई करण्यात आली. राज ठाकरे यांनी एका महिन्यात माहिमच्या समुद्रातील अनधिकृत बांधकाम पाडा, नाहीतर त्याठिकाणी गणपती मंदिर बांधू, असा इशारा दिला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -