मुंबई काँग्रेसचा ईडी कार्यालयावर मोर्चा; सोनिया, राहुल गांधींवरील कारवाईचा निषेध

आपले अपयश लपविण्यासाठी, आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी आणि महागाई व बेरोजगारी अशा अनेक गंभीर समस्यांपासून देशातील जनतेची दिशाभूल करण्यासाठी भाजप सरकारने ईडीला पुढे करून अशा प्रकारचे षडयंत्र केले आहे, असा आरोप भाई जगताप यांनी केला.

काँग्रेसच्या (Congress) राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणी ईडीकडून (ED) नोटिसा पाठविण्यात आल्या. त्यानंतर सोमवारी राहुल गांधी ईडीसमोर हजर झाले. ई़डीकडून त्यांची चौकशी सुरू आहे.

ईडीच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे (Mumbai Congress) अध्यक्ष भाई जगताप (bhai jagtap) व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे सोमवारी ईडी कार्यालयावर निषेध मोर्चा (protest  काढण्यात आला. या मोर्चामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पाटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, सहकार मंत्री विश्वजीत कदम, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान, आमदार प्रणिती शिंदे, झिशान सिद्दीकी, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष भूषण पाटील, सह कोषाध्यक्ष अतुल बर्वे, सरचिटणीस संदेश कोंडविलकर व मुंबई काँग्रेस महिला अध्यक्ष अनिशा बागुल तसेच मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोर्चामध्ये काँग्रेस नेत्यांनी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आपले अपयश लपविण्यासाठी, आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी आणि महागाई व बेरोजगारी अशा अनेक गंभीर समस्यांपासून देशातील जनतेची दिशाभूल करण्यासाठी भाजप सरकारने ईडीला पुढे करून अशा प्रकारचे षडयंत्र केले आहे, असा आरोप भाई जगताप यांनी केला.