घरराजकारणआघाडीत पुन्हा बिघाडी; काँग्रेसचा स्वबळाचा नारा

आघाडीत पुन्हा बिघाडी; काँग्रेसचा स्वबळाचा नारा

Subscribe

महत्त्वाचे म्हणजे बुधवारी महाविकास आघाडीची आगामी निवडणुकांबाबत बैठक होणार आहे. त्याआधीच पटोले यांनी हा दावा केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस व शिवसेना हे महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवणार की हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार यावर आता प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

मुंबईः सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काॅंग्रेस पक्षासाठी पोषक असे वातावरण आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत काॅंग्रेस पक्ष स्वबळावर निवडून येऊ शकतो, असा दावा काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. नागपूर येथील काॅंग्रेस कार्यसमिती सदस्यांच्या बैठकीत पटोले यांनी हा दावा केला.

महत्त्वाचे म्हणजे बुधवारी महाविकास आघाडीची आगामी निवडणुकांबाबत बैठक होणार आहे. त्याआधीच पटोले यांनी हा दावा केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस व शिवसेना हे महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवणार की हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार यावर आता प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

- Advertisement -

नागपूर येथे काॅंग्रेस कार्यसमिती बैठक पार पडली. बंद दाराआड झालेल्या या बैठकीत पटोले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी पटोले यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. मुंबई व आसपासच्या परिसरात काॅंग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे तेथे आपले संख्याबळ नक्कीच वाढेल. कोकणात सध्या आपला एकही आमदार नाही. आज कोकणातील राजकीय स्थिती पाहता काॅंग्रेसला तेथे संधी आहे. तेथे आपला आमदार नक्कीच निवडून येईल. सोलापूर, नाशिक, अहमदनगर येथे काॅंग्रेसच्या आमदारांची संख्या तुरळक आहे. तेथेही आपले आमदार वाढतील, असा आशावाद पटोले यांनी व्यक्त केला.

काॅंग्रेस संपेल या वक्तव्याचाही पटोले यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, काहीजण काँग्रेसला संपवायला निघाले होते, काँग्रेस संपली तर आपण जिवंत राहू, असे काही लोक सतत बोलत होते. खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर तेच लोकं काँग्रेस संपू शकत नाही असे बोलू लागले आहेत. काॅंग्रेसमध्ये बंड करणारे शरद पवार हे काॅंग्रेसच्या स्थापना दिवसाला हजर होते, असेही पटोले यांनी सांगितले.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा बलशाली नेते काॅंग्रेसमध्ये आहेत. काॅंग्रेसमधील नेते खोकेवाले नाहीत व धोकेवालेही नाहीत, असा टोला पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -