मुंबई: ठाकरे गटाचे माजी नगरसेवकर अभिषेक घोसाळकर यांची गुरूवारी सायंकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हत्याप्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. विरोधी पक्ष राज्य सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. विरोधक कायदा आणि सुव्यवस्थेवरून थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. काही विरोधकांनी गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Nana Patole Goons walk with rulers is this a government of goons Many factions attacked the government)
राज्यकर्ते हे गुंडांसोबत फिरत आहेत. हे गुंडांचं सरकार आहे का? असं म्हणत नाना पटोलेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
नाना पटोले म्हणाले की, सध्या राज्यकर्तेचं गुंडांसोबत दिसतात. त्यामुळे राज्यात गुंडाराज सुरू आहे. अवैध हत्यारं बाळगण्यात नागपुरचा पहिला नंबर आहे तर त्यामागे ठाणे आणि मुंबई, पुणे या शहरांचा नंबर आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये जर का अशा पद्धतीने गुंडाराज सुरू असेल, तर मग राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजबारा उडाल्याचंच चित्र आहे.
फडणवीसांची प्रतिक्रिया काय?
फडणवीस म्हणाले की, गोळीबाराची घटना गंभीर आहे. मात्र, त्याचं राजकारण करणं योग्य नाही. या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्था संपलेली आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. कारण ही हत्या व्यक्तिगत वैमनस्यातून घडली आहे. ज्यांच्याकडे बंदुकांचं लायसन्स आहे, त्यांची पडताळणी करणं आणि नवीन लायसन्स देताना काय खबरदारी घेतली पाहिजे? याचा विचार सरकार नक्कीच करेल, असंही ते म्हणाले.
( हेही वाचा: Nana Patole: राज्यकर्त्यांसोबत गुंड फिरतात, हे गुंडांचं सरकार आहे का? नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल)