घरराजकारणजितेंद्र आव्हांडांच्या गटबाजीला वैतागत, राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

जितेंद्र आव्हांडांच्या गटबाजीला वैतागत, राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

Subscribe

राज्यातील सत्तासमीकरणे बदलली आहेत. दररोज प्रत्येक पक्षातर्फे पक्षबांधणीसाठी नवी रणनीती आखली जाते. अशातच शिवसेनेतील संघर्ष उफाळला आहे. तर दुसरीकडे आता पक्षांतर्गत कुरघोडी, राजकारणामुळे राष्ट्रवादीतील नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी नुकतंच राजीनामा दिला असून आमदार जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षातील उपऱ्या नेत्यांमुळे राष्ट्रवादील राम राम केल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

 

- Advertisement -

राष्ट्रवादीमध्ये देखील गटबाजीमुळे अंतर्गत कलह वाढत चालला असल्याचे दिसतेय. अशोक गावडे यांनी पक्ष सोडल्याचे मूळ कारण म्हणजे जितेंद्र आव्हाड आणि शिशिकांत शिंदे यांच्यासह काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत आलेल्या नेत्यांचा वाढता हस्तक्षेप होय. गेल्या अनेक दिवसांपासून मी हे राजकारण सहन करतोय याबाबत वरिष्ठांना देखील तक्रार केली. मात्र माझ्या तक्रारीची दखल घेण्यात आली नसल्याचे गावडे यांनी म्हंटल आहे.

 

- Advertisement -

मी गेल्या अनेक वर्षापासून पक्षासोबत जोडला गेलो आहे तसचे निस्वार्थीपणाने मी पक्षासाठी काम केलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे माझ्या आदरस्थानी आहेत व पुढे कायम राहतील अशी भावना गावडे यांनी व्यक्तकेली. दरम्यान दोन वर्षापू्वी विष्णुदास भावे नाट्यगृहातील कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान मी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर देखील माझी तक्रार मांडली. पण यासंबधित काहीही कारवाई करण्यात आली नाही म्हणून मी राजिनामा देत असल्याचं गावडेंनी कबूल केलं आहे. यासह गावडे शिंदे गटात जाणार असल्याचीही माहीती त्यांनी यावेळी दिली आहे.

हे ही वाचा –

गजानन किर्तीकरांना शिंदे गटा कडून मोठी ऑफर

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -