घरराजकारणराज्यात महागाईचा झटका, 'सरकार गतिमान, महागाई वेगवान'; राष्ट्रवादीचा सरकारला टोला

राज्यात महागाईचा झटका, ‘सरकार गतिमान, महागाई वेगवान’; राष्ट्रवादीचा सरकारला टोला

Subscribe

राज्यात वीज, औषधे आणि प्रवास खर्चात वाढ होणार आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून ही दरवाढ केली जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागणार आहे. आता याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काॅंग्रेसने सरकारवर टीकास्त्र डागले आहे. सरकार गतिमान, महागाई वेगवान, असा टोला राष्ट्रवादीकडून लगावण्यात आला आहे.

महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. केंद्रासोबत आता राज्यात वीज, औषधे आणि प्रवास खर्चात वाढ होणार आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून ही दरवाढ केली जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागणार आहे. आता याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काॅंग्रेसने सरकारवर टीकास्त्र डागले आहे. सरकार गतिमान, महागाई वेगवान, असा टोला राष्ट्रवादीकडून लगावण्यात आला आहे.

अधिवेशन संपताच गतीमान सरकारने दरवाढीचा शाॅक देण्याचा वेगवान निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच राज्यातील गतीमान सरकारने सुपरफास्ट गतीने दरवाढीचा सपाटा लावून महागाई वाढवणा-या वेगवान निर्णयांचा धडाका लावला, अशी टीका राष्ट्रवादी काॅँग्रेसने केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ट्वीट काय?

अर्थसंकल्पात वारेमाप घोषणांची खैरात करुन अधिवेशन संपल्या संपल्या सर्वसामान्यांच्या खिशातच हात घालून त्यांचे खिसे रिकामे करायची सरकारची गतीमानता खरचं थक्क करणारी आहे. त्यामुळे सरकार गतीमान, दरवाढ वेगवान, असे म्हणत महागाई झेलण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली आहे, असे ट्वीट राष्ट्रवादीने केले आहे.

सर्वसामान्यांना लागणारी औषधे महागली

सलग दुस-यावर्षी औषधे महाग झाली आहेत. 384 औषधे ही अत्यावश्यक औषधांच्या यादीत मोडतात. त्यांना शेड्युल ड्रग्ज असे म्हटले जाते. त्यांच्या किंमती वाढणार आहेत. याशिवाय उर्वरित नाॅन शेड्यूल ड्रग्जच्या किंमती दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढतातच. औषधांच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे दरवाढीची मागणी सातत्याने केली जात होती. पेनकिलर्स, अॅंटी इन्फेक्टीव्ह, ह्रदयरोगावरील गोळ्या, अॅंटी बायोटीक्स महागणार आहेत. सरकारने औषध कंपन्यांना दरवाढीची परवानगी दिली आहे.

( हेही वाचा: मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल दरांत 1 एप्रिलपासून वाढ; ‘असे’ आहेत नवे दर )

मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल दरांत 1 एप्रिलपासून वाढ

मुंबई- पुणे एक्स्प्रेस महामार्गावरच्या टोल दरात वाढ करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून टोल दरांत तब्बल 18 टक्क्यांनी वाढ होणार आहे. मुंबई- पुणे असा प्रवास करणा-यांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. नव्या दरांनुसार, कारचा टोला 270 रुपयांवरुन 316 रुपये होणार आहे. तर बससाठी टोलचा दर 795 वरुन 940 रुपयांवर जाणार आहे. ट्रकसाठी इथे सध्या 580 रुपये दयावे लागत होते . आता यापुढे 685 रुपये द्यावे लागणार आहेत. तर टेम्पोसाठी 420 रुपयांऐवजी 495 रुपये इतका टोल भरावा लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -