राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

Chhagan-Bhujbal
इतकी क्षमता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तुमच्यात नाही, त्यामुळे इतक्या मोठ्या पहाडासारख्या व्यक्तीवर बोलू नये, असा टोला भुजबळांनी लगावला आहे. 

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे . काही दिवस छगन भुजबळ घरीच विश्रांती घेणार आहेत. 27 मार्च, सोमवारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना तातडीने येवला  येथून नाशिकला उपचारासाठी हलवण्यात आले होते. छगन भुजबळ यांच्या रक्ताचे नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर रक्त तपासणीचा अहवाल समोर आल्यानंतर भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

छगन भुजबळ सोमवारी येवला दौ-यावर होते. त्या दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यावेळी त्यांना येवल्यावरुन नाशिकमध्ये आणण्यात आले. नाशिकच्या अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यावेळी रक्ताच्या तपासण्या झाल्या आणि रिपोर्टमध्ये कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. यापुर्वीदेखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

भुजबळांची प्रकृती स्थिर

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे येवल्याला गेले होते. येवल्यावरुन परत येत असताना त्यांची तब्येत बिघडली. ताप आणि थंडी वाढल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यावेळी त्यांना तातडीने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डाॅक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना घरी जाण्यास मुभा घेण्यात आली. सध्या भुजबळ यांची प्रकृती स्थिर आहे. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असे डाॅक्टरांनी सांगितले. सध्या भुजबळ हे नाशिक येथील निवासस्थानी उपचार घेत आहेत.

( हेही वाचा: संजय शिरसाटांविरोधात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक, फोटोला फासले काळे )

नाशिकमध्ये वाढतोय कोरोना

मागच्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात एच3, एन2 (H3N2 ) या नवीन विषाणूसह कोरोना वाढू लागला आहे. नव्या विषाणूच्या रुग्णामधून नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. H3N2 इन्फुएन्झाचे प्रकार वाढत असल्याने केंद्रासह राज्य सरकारने सतर्कतेचे आवाहन केले आहे.