घरराजकारणमुंबईच्या बेस्ट बसवरील कर्नाटकच्या जाहिराती काढा नाहीतर...; आव्हाडांचा सरकारला थेट इशारा

मुंबईच्या बेस्ट बसवरील कर्नाटकच्या जाहिराती काढा नाहीतर…; आव्हाडांचा सरकारला थेट इशारा

Subscribe

काय बघायचे आम्ही कर्नाटकात जाऊन? मराठी माणसांवर होणार अत्याचार पाहायचे का? वाह रे शिंदे सरकार महाराष्ट्रातल्या भावना दुखावताना काहीच वाटले नाही? काढून टाका त्या जाहिराती नाहीतर... असे म्हणत आव्हाड यांनी सरकारला धमकीवजा इशाराच दिला आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बेस्ट बसवर लावण्यात आलेल्या जाहिरातींवरुन सरकारला आव्हान दिले आहे. कर्नाटकात जाऊन आम्ही काय मराठी माणसावर होणारे अत्याचार पाहायचे काय? असा थेट सवालच त्यांनी सरकारला केला आहे. बेस्ट बसवर ‘चला कर्नाटक नव्याने पाहूया’, अशा जाहिराती करण्यात आल्या आहेत. यावरुन आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे.

आव्हाडांच्या ट्वीटमध्ये काय?

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर टीका केली आहे. मुंबईच्या बेस्ट बसेसवर असणा-या जाहिरातींचे काही पोस्टर हातात घेतलेले फोटो त्यांनी ट्वीट केले आहेत. तसेच, सरकारला प्रश्न केले आहेत. मुंबईच्या ‘बेस्ट बसवर कर्नाटक’ नव्याने पाहूया या जाहिराती आहेत.

- Advertisement -

काय बघायचे आम्ही कर्नाटकात जाऊन? मराठी माणसांवर होणारे अत्याचार पाहायचे का? वाह रे शिंदे सरकार… महाराष्ट्रातल्या लोकांच्या भावना दुखावताना काहीच वाटले नाही? काढून टाका त्या जाहिराती नाहीतर… असे म्हणत आव्हाड यांनी सरकारला धमकी वजा इशाराच दिला आहे.

- Advertisement -

…तर 12 तासांत बेस्ट बस फोडू

23 मार्च, गुरुवारी जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये त्यांनी बेस्ट बसवरील जाहिराती 12 तासांत काढा नाहीतर मुंबईकर बस फोडतील असे म्हटले होते. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, एकीकडे सीमा भागात राहणा-या मराठी बांधवांवर अत्याचाराची मालिका सुरु आहे. आरोग्य सेवा लागू करु देणार नाही, असे कर्नाटकने सांगितले. त्याच कर्नाटकला छाताडावर बसवण्याचे काम सरकार करत असल्याचे आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. बेस्ट बसवर चला कर्नाटक बघुया अशाप्रकारे जाहिरात करण्यात आली आहे. मराठी माणसाच्या ह्रदयाला  काढलेला हा चिमटा आहे. त्याचा फोटोही जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केले होते. बेस्टवरच्या जाहिराती काढा नाहीतर मराठी माणूस बेस्ट फोडणार. मुंबईची जनता रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

( हेही वाचा: राहुल गांधींवरील कारवाईनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, वाचा सविस्तर… )

 

महाराष्ट्राने जाहीर केलेला निधी आम्ही रोखू 

महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद सर्वश्रूत आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटक नेहमीच काही ना काही कुरघोड्या करत असतं. महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील मराठीबहुल गावांसाठी निधी जाहीर केला आहे. या निधीविरोधात कर्नाटक सरकारने आडमुठी भूमिका घेतली आहे. महाराष्टाने जाहीर केलेला हा निधी आम्ही रोखू, असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -