भाजपच्या 105 आमदारांमध्ये 50 आमचेच हे लक्षात ठेवा; सुप्रिया ताईंचा इशारा

ncp mp supriya sule slams bjp over new eknath shinde and devendra fadanvis maharashtra

राज्यातील शिंदे – फडणवीस सरकराला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगेलच सुनावले आहे, निवडणुका असो वा नसो आपल्या पक्षाच्या बैठका या होतात. विरोधी पक्षात असताना लोकांनी शरद पवारांना जास्त प्रेम दिले. सत्तेत असतानाही प्रेम दिले. आता जे काही 105 असल्याचे बोलत आहेत त्यात आपल्या पक्षातून गेलेले आपले 50 आहेत हे लक्षात ठेवा असा सूचक इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.

काय करायच जेव्हा साहेबांना विचारते त्यावेळी पवारसाहेब पावसाचे वातावरण थोडे कमी झाल्यावर गाडी बाहेर काढून शेवटच्या युवकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत आहेत, असही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पैसे देऊन जाणारे आहेत. त्याच्यामागे सध्या काय राजकारण सुरु आहे हे लक्षात आले पाहिजे. मात्र आपण विरोधात असताना आपल्या पक्षाने लीड घ्यावा, असे देशातील लोकांना वाटत आहे, नवाबभाई यांनी दिल्लीला अक्षरश: हलवून सोडलं होत. मोठा फर्जीवाडा बाहेर काढल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, तर दुसरीकडे अनिल देशमुखांवरहगी कारवाई झाली, हा एकप्रकारे अन्याय झाला असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला.

तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवारांनी एकत्र दौरा काढला तर राज्यात मोठा बदल होऊ शकतो. त्यामुळे 2024 मध्ये राष्ट्रवादी हा नंबर एकचा पक्ष होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


हेही वाचा : वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल होताच सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा